Laylatul Qadr Messages: मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानला जाणारा रमजानचा महिना सध्या सुरु आहे. आज 26वा रोजा असून आजच्या दिवशी शब-ए-क़द्र साजरी केली जाते. इस्लाममध्ये सर्वात पवित्र रात्रींपैकी एक अशी शब-ए-क़द्र ची रात्र मानली जाते. त्यास लैलात अल-कद्र (Laylat al-Qadr) असेही म्हणतात. इस्लामिक श्रद्धेनुसार लैलातुल कद्रच्या रात्री पहिल्यांदा पैगंबर मोहम्मदला कुराणचे पहिले छंद माहित पडले होते. रात्रभर इबादत केली जाते आणि अल्लाहचे मन वळवले जाते. तसंच या दिवशी मुस्लिम बांधव पैगंबर मुहम्मद यांच्या जीवनातील विविध पैलू, शिकवण, धार्मिक उपदेश याचे स्मरण करतात.
शब-ए-कद्रच्या निमित्ताने शुभेच्छा संदेश, Messages, Images आणि Greetings सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करुन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा द्या.
शब-ए-कद्र मुबारक!
काही दिवसांतच रमजानचा पवित्र महिना संपेल आणि ईद साजरी केली जाईल. यंदा 14 मे रोजी भारतात ईद साजरी केली जाईल. मात्र चंद्र दर्शनावर ईद कधी साजरी होणार हे ठरतं.