
Indian Air Force Day 2022 Messages: आज भारतीय हवाई दलाचा 90 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. भारतीय हवाई दलाची स्थापना 90 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली. देशाच्या हवाई क्षेत्राचे रक्षण करण्याची जबाबदारी शूर भारतीय हवाई दलाच्या खांद्यावर आहे. या दिवशी, भारतीय हवाई दलाचे धाडसी वैमानिक लष्कराच्या विविध विमानांसह एक अप्रतिम एअर शो करतात. वायुसेना दिन दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी भारतीय हवाई दल आपली ताकद दाखवणार असून, त्यासाठी हवाई दलाने विशेष तयारी केली आहे. वायुसेना दिनानिमित्त चंदीगडमध्ये एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे.
या एअर शोमध्ये 83 विमाने सहभागी होणार आहेत. एअर शोमध्ये भाग घेणार्या विमानांमध्ये 44 लढाऊ विमाने, 7 वाहतूक विमाने, 20 हेलिकॉप्टर आणि 7 विंटेज विमाने असतील. त्याचबरोबर 9 विमाने स्टँडबायवर ठेवण्यात येणार आहेत. यावेळी एअर शोची खास गोष्ट म्हणजे यात नवीन हलके कॉम्बॅट हेलिकॉप्टर देखील समाविष्ट केले जाणार आहेत. भारतीय वायूसेनेच्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त WhatsApp Stickers, Facebook Greetings, Quotes, Images द्वारे आपल्या मित्र-परिवारास खास मराठी शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
आपला देश स्वातंत्र्य आहे,
याचा आनंद नक्की घ्या,
पण देशाला स्वातंत्र्य देणाऱ्या
सैनिकांचे बलिदान कधीच विसरू नका.
भारतीय वायुसेना दिनाच्या शुभेच्छा!

आयुष्यभर कैदी राहण्यापेक्षा
स्वातंत्र्यासाठी लढत मरणे चांगले
भारतीय वायुसेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारत हा सोन्याचा पक्षी आहे तर
वायुसेना हे त्यांचे सोनेरी पंख आहेत.
भारतीय वायुसेना दिनाच्या शुभेच्छा!

वारा वाहतो म्हणून आपला तिरंगा फडकत नाही तर
त्याच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या
प्रत्येक सैनिकाच्या शेवटच्या श्वासाबरोबर तो फडकतो.
भारतीय वायुसेना दिनाच्या शुभेच्छा!

भारतीय हवाई दलातील सर्व शूर जवानांना सलाम,
ज्यांच्या समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेमुळे आम्ही सुरक्षित आहोत
या सर्व जवानांचा आम्हाला अभिमान वाटतो.
भारतीय वायुसेना दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

दरम्यान, 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेच्या विमानाने 1 एप्रिल 1933 रोजी पहिले उड्डाण केले. त्यावेळी RAF द्वारे प्रशिक्षित 6 अधिकारी आणि 19 हवाई सैनिक होते. भारतीय वायूसेना दिनाच्या निमित्ताने हवाई दल आपले विशेष विमान आणि सैनिकांचे पराक्रम दाखवते. वायुसेना दिनानिमित्त नेत्रदीपक परेड आणि एअर शोचे आयोजन केले जाते. स्वातंत्र्यापूर्वी हवाई दलाला RIAF म्हणजेच रॉयल इंडियन एअर फोर्स असे संबोधले जात असे. स्वातंत्र्यानंतर त्यातून ‘रॉयल’ हा शब्द वगळून फक्त ‘इंडियन एअर फोर्स’ असा करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धात भारतीय हवाई दलानेही महत्त्वाची भूमिका बजावली होती.