Ganesh Visarjan 2022 Messages (PC - File Image)

Ganesh Visarjan 2022 Messages: दहा दिवसीय गणेशोत्सवाला 31 ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविक घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात आणि दहा दिवस बाप्पाची पूजा करतात. पारंपारिकपणे, गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक भगवान गणेशाच्या मूर्तीची आपल्या घरी स्थापना करतात. असं म्हटलं जात की, कैलास पर्वतावरून आल्यानंतर भगवान गणेश आपल्या भक्तांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर येतात. यानंतर, लोक बाप्पाचे विसर्जन दीड, तीन, पाच, सात आणि अकराव्या दिवशी करतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते.

तुम्हीही आपल्या घरी दीड दिवसाच्या गणपतीची स्थापना केली असेल तर तुम्ही या दिवशी गणपती विसर्जनाचे मेसेज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मित्र-परिवारास शेअर करू शकता. यासाठी तुम्हाला खालील मेसेज नक्की उपयोगात येतील. तुम्ही हे मेसेज डाऊनलोड करू शकता.

निरोप देतो आता

देवा आज्ञा असावी

चुकले आमचे काही देवा

क्षमा असावी...

गणपती बाप्पा मोरया!

Ganesh Visarjan 2022 Messages (PC - File Image)

गणपती बाप्पा मोरया

पुढच्या वर्षी लवकर या!

Ganesh Visarjan 2022 Messages (PC - File Image)

क्षण निरोपाचा जवळ आला

का घेत आहेस तू निरोप माझ्या मायबापा,

मनात घर करुन तू सोडून निघालास..

गणपती बाप्पा मोरया!

Ganesh Visarjan 2022 Messages (PC - File Image)

डोळ्यात आले अश्रू

बाप्पा आम्हाला नका विसरु..

आनंदमय करुन चालले तुम्ही,

पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..

गणपती बाप्पा मोरया

पुढच्या वर्षी लवकर या!

Ganesh Visarjan 2022 Messages (PC - File Image)

गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगलमूर्ती

तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख, वेदना

घेऊन जावो! हीच आमची कामना

बाप्पा मोरया !

Ganesh Visarjan 2022 Messages (PC - File Image)

रिकामं झालं घर, रिता झाला मखर

पुढल्या वर्षी लवकर येण्यास

निघाला आमचा लंबोदर!

Ganesh Visarjan 2022 Messages (PC - File Image)

दरम्यान, अनेक भाविक दीड दिवसांसाठी आपल्या घरी बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करतात. कारण सर्वच भाविकांना 11 दिवसांच्या गणपतीचे आपल्या घरी स्थापना करणे शक्य होत नाही.