
माघ पंचमीचा दिवस हा वसंत पंचमी (Vasant Panchami) म्हणून साजरा केला जातो. वसंत ऋतूची या दिवसापासून सुरूवात होत असल्याने वातावरणामध्ये बदल होण्यास सुरूवात होत असतात. धार्मिक मान्यतांनुसार या वसंत पंचमी दिवशीच सरस्वती माता प्रकट झाल्याची धारणा असल्याने तिच्या जन्म दिनाचा सोहळा म्हणून देखील वसंत पंचमीला सरस्वती मातेची पूजा (Saraswati Puja) करण्याची रीत आहे. यंदा वसंत पंचमी 14 फेब्रुवारी दिवशी आहे. उत्तर भारतामध्ये हा दिवस बसंत पंचमी म्हणून ओळखला जातो. पंजाब, हरियाणा सारख्या उत्तर प्रदेशातील राज्यामध्ये बसंत पंचमीची विशेष धूम असते. मग या दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, प्रियजणांना, मित्र मंडळींना देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रं, Greetings, Wishes, Images, WhatsApp Status, Stickers शेअर करून या मंगलमय दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.
सरस्वती मातेनेच या सृष्टीला वाणी दिली. त्यामधूनच मनुष्यजातीला ज्ञानाचा प्रकाश प्राप्त झाला आहे. पौराणिक कथेनुसार, जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती पूर्ण केली तेव्हा त्यांना आढळले की विश्वात सर्व काही आहे, परंतु सर्व काही मूक, शांत आणि नीरस आहे. मग त्यांनी आपल्या कमंडलातून पाणी काढून शिंपडले, त्यामुळे माता सरस्वती तेथे प्रकट झाली. त्यांनी हातात वीणा, जपमाळ आणि पुस्तक घेतले होते. माता सरस्वतीने वीणासोबत वसंत राग वाजवला. त्याचाच परिणाम म्हणून सृष्टीला वाणी आणि संगीत लाभले. हा दिवस माघ शुक्ल पंचमीचा होता म्हणून दरवर्षी या तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते आणि देवी सरस्वतीची पूजा केली जाते. Vasant Panchami 2024: वसंत पंचमीला पिवळ्या रंगाचे महत्व , जाणून घ्या, काय आहे संबंध .
वसंत पंचमी आणि सरस्वती मातेच्या प्रकट दिनाच्या शुभेच्छा

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना॥या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥

वसंत पंचमी निमित्त सरस्वती पूजनेच्या हार्दिक शुभेच्छा

वसंत पंचमी च्या शुभेच्छा

सरस्वती देवीच्या जन्मदिनाच्या भक्तिमय शुभेच्छा

सरस्वतीच्या पूजनाने आपण ज्ञानसमृद्ध व्हावे ही सदिच्छा वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
वसंत पंचमी च्या दिवशी नवी विद्या, संगीत शिकण्यास सुरूवात केली जाते. अनेक जण या दिवशी शुभ कामाची सुरूवात केली जाते. अनेक जण या दिवसाचं औचित्य साधत विवाह सोहळे देखील आयोजित करतात. वसंत पंचमी ही श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणून देखील ओळखली जाते.