Sant Tukaram Beej 2024 Images: संत तुकाराम बीज निमित्त WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत तुकोबांना करा अभिवादन
तुकाराम बीज । File Image

संत तुकाराम (Sant Tukaram) यांचे फाल्गुन वद्य द्वितीयेला सदेह वैकुंठी निर्मगन झाले तो दिवस वारकरी संप्रदायातील मंडळी तुकाराम बीज म्हणून पाळतात. संत तुकारामांच्या स्मरणार्थ या दिवशी विविध सोहळ्यांचे आयोजन केले जाते. यंदाच्या दिवशी हा संत तुकाराम बीज (Sant Tukaram Beej ) दिवस 27 मार्च दिवशी आहे. मग तुमच्या नातेवाईकांना, वारकरी मित्र मंडळींना या संत तुकाराम बीज दिवसानिमित्त खास फोटोज पाठवून तुम्ही या दिवशी जगदगुरू संत तुकारामांप्रति आपली श्रद्धा अर्पण करू शकाल. WhatsApp Status, Facebook, Instagram Messages द्वारा तुम्ही आजच्या दिवशी त्यांचे फोटोज शेअर करू शकाल.

संत तुकाराम हे  17 व्या शतकातील संत आणि कवी होते.  त्यांनी आपल्या साहित्यामधून, भजन, अभंगांमधून समाजाचे प्रबोधन केले होते. बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी मोठ्या संख्येने देहूमध्ये दाखल होतात. वैकुंठगमन सोहळ्याच्या ठिकाणी इंद्रायणी नदी घाटावर  खास तयारी केली जाते. वारकरी येथे आपली श्रद्धा अर्पण करतात. नक्की वाचा: Tukaram Beej 2024 Date: तुकाराम बीजची तारीख आणि इतिहास, जाणून घ्या 

संत तुकाराम बीज निमित्त तुकोबांना अभिवादन

 

तुकाराम बीज । File Image

आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी |

बोलिले जे ऋषि | साच भावे वर्ताया |

तुकाराम महाराज यांना  अभिवादन

तुकाराम बीज । File Image

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या बीज दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन

तुकाराम बीज । File Image

संत तुकाराम महाराज बीज निमित्त अभिवादन

तुकाराम बीज । File Image

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना  त्रिवार अभिवादन

तुकाराम बीज । File Imageतुकाराम बीज निमित्त तुकोबारायांना कोटी कोटी प्रणाम!

संत तुकारामांनी 1650 साली फाल्गुन कृष्ण पक्षाच्या दुस-या दिवशी मध्यान्हाला आपला देह सोडला अशी आख्यायिका आहे. ‘आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा, रामराम घ्यावा’, असं म्हणत संतश्रेष्ठ तुकोबारायांनी देहू नगरीतून सदेह वैकुंठागमन केलं अशी वारकरांची भावना आहे.