1910 साली ऋषीपंचमीच्या (Rishi Panchami) दिवशी गजानन महाराजांनी (Gajanan Maharaj) समाधी घेतली होती. तेव्हापासून दरवर्षी ऋषीपंचमीला शेगावात (Shegaon) पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. आज ऋषीपंचमी म्हणजेच श्री संत गजानन महाराजांची (Shri Sant Gajanan Maharaj) पुण्यतीथी. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभुमिवर गेले दोन वर्ष हा सोहळा पार पडला नाही तरी यावर्षी भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महारांजांच्या दर्शनासाठी दरवर्शी हजारोंच्या संख्येने भाविक शेगावी हजेरी लावतात. काल पासूनच शेगाव देवस्थान स्थळी मोठी गर्दी बघायला मिळत आहे. तरी महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांच्या काल मध्यरात्री पासून लांबचं लांब रांगा लागल्या आहेत.
ऋषीपंचमीला (Rishi Panchami) दरवर्षी राज्यभरातून शेकडो पालख्या शेगावात (Shegaon) दाखल होता. या सोहळ्यास शंभरवर्षहून अधिक कालावधीची परंपरा आहे. यावर्षीही जवळपास 500 भजनी दिंड्या शेगावात दाखल झालेल्या आहेत. पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींच्या पालखी आणि नगरपरिक्रमेत सामील होऊन महाप्रसाद (Mahaprasad) घेऊन आपापल्या गावी रवाना होतात. आज दिवसभर मंदिरात मोठ्या भक्तीमय वातावरणात वेगवेगळ्या कार्यक्रमांनी हा सोहळा संपन्न होणार आहे.
आज सकाळपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी मंदिर परिसरात बघायला मिळत आहे. जवळपास एक लाख भाविक गजानन महाराजांचा पुण्यतिथी सोहळ्यासाठी शहरात दाखल झाले आहेत. गजानन महाराजांचा पुण्यतिथी सोहळा हा मंदीर प्रशासनातर्फे साजरा करण्यात येणारा एक मोठा सोहळा असतो. ऋषीपंचमीला सकाळी 11 वाजता गजानन महाराजांची मुख्य आरती केल्या जाते आणि त्यानंतर गजानन महाराजांच्या पालखीच्या नगर परिक्रमा सोहळ्याला सुरुवात होते.