Sant Gadge Baba Death Anniversary 2020: संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त  Quotes, HD Greetings, Wallpapers, Whatsapp Status शेअर करुन समाजप्रबोधनात उचला खारीचा वाटा
Sant Gadge Baba | (Photo Credit: File Image)

संत गाडगे बाबा (Sant Gadge Baba) यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 या दिवशी तर मृत्यू 20 डिसेंबर 1956 या दिवशी झाला. गाडगे बाबा यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर (Debuji Zhingraji Janorkar) होते. परंतू, आयुष्यभर ते संत गाडगे बाबा नावाने ओळखले गेले. आजही त्यांना संत गाडगे बाबा नावानेच ओळखले जाते. सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता विषयांत गाडगे बाबा यांना विशेष रुची होती. त्यामुळे ते गावोगावी फिरत. ते आपल्यासोबत केवळ एक मडके (गाडगे) आणि झाडू बाळगत. त्यामुळे लोक त्यांना गाडगे बाबा म्हणून ओळखू लागले. ते जेथे जात तेथे दिवसभर स्वच्छता करत आणि रात्री किर्तन करुन समाज प्रबोधन करत. त्यांच्या समाज प्रबोधनातील काही विचार आज त्यांच्या जयंतीनिमित्त (Sant Gadge Baba Death Anniversary 2020) इथे देत आहोत.संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त Quotes, HD Greetings, Wallpapers, Whatsapp Status शेअर करुन समाजप्रबोधनात उचला खारीचा वाटा.

Sant Gadge Baba | (Photo Credit: File Image)

 

Sant Gadge Baba | (Photo Credit: File Image)

 

Sant Gadge Baba | (Photo Credit: File Image)

 

Sant Gadge Baba | (Photo Credit: File Image)
Sant Gadge Baba | (Photo Credit: File Image)

विसाव्या शकतात महाराष्ट्रामध्ये जितके समाजपुरुष , समाजसुधारक होऊन गेले त्यामध्ये गाडगे बाबांचा समावेश होतो. संत गाडगे बाबा यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर असे होते. दिन दुबळे आणि पिडितांच्या सेवेसाठीच त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. ते स्वच्छेतेच्या माध्यमातून समाजाला उपक्रम देत. तर, आपल्या किर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करत. आपल्या किर्तनाच्या माध्यमातून संत गाडगे महाराजांनी समाजातील दांभीकतेवर जोरदार प्रहार केला.