Ganpati Bappa Puja (Photo Credits: Commons.Wikimedia.Org)

Sankashti Chaturthi October 2019 Moon Rise Time:  दर महिन्याला कृष्ण पक्षात येणार्‍या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. एका वर्षात 12 आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी असतात. गणेश भक्तांसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस खास असतो. या दिवशी गणेश पूजनाला विशेष महत्त्व असते. काही गणेशभक्त संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) दिवशी गणरायाची आराधना करण्यासोबतच उपवास देखील करतात. पुरुष व स्त्रिया या दोघांसाठी विघ्न हरण करून सुख, मांगल्य, शांती यासाठी संकष्ट चतुर्थीचं व्रत करण्याची प्रथा आहे. ऑक्टोबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज (17 ऑक्टोबर) दिवशी साजरी केली जाणार आहे. धार्मिक प्रथा आणि परंपरेनुसार संकष्टीचा उपवास करणारे चंद्रोदय झाल्यानंतर नैवेद्य गणपतीसमोर दाखवून त्याची पूजा अर्चना केल्यानंतर उपवास सोडला जातो. मग पहा आज संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडण्यासाठी पहा मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मधील चंद्रोदयाची वेळ काय?

ऑक्टोबर 2019 मधील चंद्रोदयाची वेळ काय?

आज देशभरात करवा चौथ सोबतच संकष्टी चतुर्थी देखील आहे. त्यामुळे आज देशभर उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्रात गणेशभक्त संकष्टी चतुर्थीचं औचित्य साधून गणरायाच्या मंदिराला भेट देतात. त्याचं दर्शन घेऊन विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना केली जाते. मग संध्याकाळी तुम्हांला चंद्रोदयानंतर उपवास सोडायचा असेल तर पहा तुमच्या शहरात चंद्रोदयाची नेमकी वेळ काय?

मुंबई - 20.48

पुणे- 20.45

नाशिक - 20.43

नागपूर- 20.19

रत्नागिरी - 20.49

Sankashti Chaturthi 2019: संकष्टी चतुर्थी निमित्त उपवासाचे बटाटे वडे कसे बनवाल?

मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवद्याचा पदार्थ आहे. त्यामुळे संकष्टी चतुर्थीला अनेक गणेश उपवास सोडताना मोदकांचा नैवेद्य दाखवतात. तसेच गणरायाच्या पूजेमध्ये आज जास्वंद, दुर्वा यांचा वापर केला जातो. 108 वेळा श्री गणेशाय नम: मंत्राचा जप करून गणरायाची मनोभावे पूजा केली जाते. यामुळे संकटं दूर होतात.