जानेवारी महिन्यामध्ये 29 जानेवारीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आहे. गणेशभक्तांसाठी दर महिन्यात येणारा हा चतुर्थीचा दिवस खास असतो. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी अनेकजण मनातील इच्छा पूर्ण होवोत या अपेक्षेने गणपती बाप्पा कडे व्रत करतात. या व्रताची सांगता चंद्रोदयानंतर केली जात असल्याने संकष्टी चतुर्थीच्या चंद्रोदयाच्या वेळा खास असतात. महाराष्ट्रभर प्रत्येक शहरानुसार चंद्रोदयाच्या वेळेमध्ये थोडाफार फरक असतो. त्यामुळे तुमच्या शहरातील चंद्रोदय पहा.
संकष्टी चतुर्थी च्या दिवशी गणरायाची विधिवत पूजा केली जाते. बाप्पाला दूर्वा, फूलं अर्पण केली जातात. नैवेद्याला उकडीचे मोदक बनवले जातात. गणेश मंदिरामध्ये जाऊन देखील अनेक भाविक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात. नियमित संकष्टीचा उपवास करणारी मंडळी बाप्पाची घरी देखील या दिवशी साग्रसंगीत पूजा करतात. उपवासाच्या जेवणात कांदा-लसूण विरहित जेवणाचा समावेश करतात.
पहा चंद्रोदयाची वेळ
मुंबई 21.30
पुणे 21.26
नाशिक 21.26
नागपूर 21.03
गोवा 21.18
आपले मागणे देवापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम नववर्षातील ही पहिली संकष्टी असल्यामुळे त्याचे महत्त्वही तितकेच खास आहे. आज अनेक लोक गणपतीची आराधना करतात. त्याच्यासाठी उपवास करतील.