Sambhaji Maharaj Jayanti Messages (Photo Credits-File Image)

Sambhaji Maharaj Jayanti 2022 Messages: छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म तिथीनुसार ज्येष्ठ शु. द्वादशीला झाला. त्यामुळे तिथीनुसार यंदा 11 जून रोजी संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. इंग्रजी कालगणनेनुसार 14 मे 1657 रोजी झाला. शिवाजीपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजी महाराजांचे जीवनही वडील छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच देश आणि हिंदुत्वासाठी समर्पित होते. संभाजींनी लहानपणापासूनच राज्यातील राजकीय प्रश्न सोडवले.

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. परंतु, संभाजी 2 वर्षांचे होते तोपर्यंत सईबाईंचा मृत्यू झाला होता, म्हणून संभाजींचे पालनपोषण शिवाजीच्या आई जिजाबाई यांनी केले. संभाजी महाराज जयंतीनिमित्त तुम्ही मराठी SMS, Messages, Whatsapp Status द्वारे खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

Sambhaji Maharaj Jayanti Messages (Photo Credits-File Image)

सिंहाची चाल,

गरुडा ची नजर,

स्रीयांचा आदर,

शत्रूचे मर्दन,

असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,

हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…

जय संभाजी

जय शंभुराजे!

Sambhaji Maharaj Jayanti Messages (Photo Credits-File Image)

धर्मशास्रपंडित

ज्ञानकोविंद

सर्जा

रणधुरंदर

क्षत्रियकुलावतांस

सिंहासनधिश्वर

छत्रपची संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

Sambhaji Maharaj Jayanti Messages (Photo Credits-File Image)

इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावर

मातीच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर

राज्य करणारा राजा म्हणजे राजा संभाजी छत्रपतींना मानाचा मुजरा

संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Sambhaji Maharaj Jayanti Messages (Photo Credits-File Image)

श्रृंगार होता संस्काराचा

अंगार होता स्वराज्याचा

शत्रुही नतमस्तक होई जिथे

असा पुत्र माझ्या शिवबाचा

छत्रती संभाजी महाराच जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Sambhaji Maharaj Jayanti Messages (Photo Credits-File Image)

संभाजी महाराजांना छावा असेही म्हणतात, ज्याचा मराठीत अर्थ शावक, म्हणजेच सिंहाचे बाळ असा होतो. संभाजी महाराज संस्कृत आणि इतर 8 भाषांचे जाणकार होते.