Sambhaji Maharaj Death Anniversary 2020 (Photo Credits: File Photo)

Sambhaji Maharaj Death Anniversary 2020 HD Images: छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी राजे महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा आज स्मृतिदिन आहे. संभाजी महाराज यांच्या कार्यामुळे त्यांच्या नावापुढे शेर शिवा का छावा, धर्मवीर, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, शूरवीर अशी अनेक बिरुदे लावली जातात.

संभाजी महारांना लहानपणापासूनच मोहिमा आणि राजकारणांच्या डावपेचांचे बाळकडू मिळाले होते. संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनंतर मराठा स्वराज्याचे खंबीरपणे रक्षण केले. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवणारे संभाजी महाराज गनिमाच्या तावडीत सापडले होते. 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांची प्राणज्योत मालवली होती. आज 24 मार्च रोजी संभाजी महाराजांची तिथीप्रमाणे पुण्यतिथी साजरी केली जाते. आज या दिवसाचे औचित्य साधून आपल्या मित्र-मैत्रिणींना Whatsapp Status, HD Images शेअर करून शंभूराजांना अभिवादन करण्यासाठी खालील प्रतिमा नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Sambhaji Maharaj Punyatithi 2020 Messages: संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त शंभुराजे यांना अभिवादन करणारे मराठी HD Images आणि Whatsapp Status)

Sambhaji Maharaj Death Anniversary 2020 (PC - File Image)

संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या पोटी 12, शके 1579 रोजी पुरंदर गडावर झाला होता. ते केवळ 2 वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्रींना देवाज्ञा झाली. अशा प्रकारे लहानपणापासून त्यांच्यावर काळाच्या आघाताला सुरूवात झाली. सईबाईंच्या पश्र्चात राजमाता जिजाबाई शंभूराजांच्या पालनपोषणाची सर्व व्यवस्था पाहिली आणि त्यांना शिवाजी महाराजांप्रमाणे शुर बनवले.