
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2023 HD Images: राजश्री शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. शाहूजी महाराज 2 जुलै 1894 रोजी कोल्हापूरचे राजे झाले. शाहू महाराजांनी राज्य आणि समाजावरील ब्राह्मणांचे वर्चस्व मोडून काढले. शाहूजी महाराजांनी 26 जुलै रोजी ब्राह्मणांच्या तीव्र विरोधानंतर आपल्या राज्यात दलित-मागासांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण लागू केले. आधुनिक भारतातील जातीवर आधारित हे पहिले आरक्षण होते. म्हणूनच शाहूजींना आधुनिक आरक्षणाचे जनक म्हटले जाते. पुढे डॉ. आंबेडकर बाबासाहेब यांनी भारतीय संविधानात शाहूजींनी लागू केलेल्या आरक्षणाचा विस्तार केला.
छत्रपती शाहू महाराज हे समता, न्याय आणि बंधुता यावर आधारित समाज निर्माण करणारे राजे होते. छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त खालील Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून तुम्ही या थोर समाजसुधारकाच्या स्मृतिस विनम्र अभिवादन करू शकता. (हेही वाचा -Rajarshi Shahu Maharaj Chhatrapati Death Anniversary: राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी HD Images, Wallpapers)






थोर समाजसुधारक छत्रपती शाहूजी महाराज यांचे 6 मे 1922 रोजी निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचा मोठा मुलगा राजाराम तिसरा कोल्हापूरचा महाराजा झाला. छत्रपती शाहूंनी सुरू केलेल्या सुधारणांचा वारसा पुढे नेण्यासाठी सक्षम नेतृत्वाअभावी हळूहळू संघर्ष सुरू झाला हे दुर्दैवी आहे.