Rath Saptami Rangoli Design: रथ सप्तमी किंवा रथसप्तमी यंदा 16 फेब्रुवारीला आहे. ज्याला माघ सप्तमी देखील म्हंटले जाते, हा एक हिंदू सण आहे जो माघ महिन्याच्या शुक्ल पक्ष सप्तमीला येतो. या दिवशी सूर्य उत्तर गोलार्धाकडे जातो. हा काळ शुभ मानला जातो. दरम्यान, या दिवशी सूर्य प्रकट झाले होते त्यांचा जन्म झाला होता त्यामुळे रथसप्तमीला सूर्य जयंती म्हणून देखील साजरा केला जातो. रथ सप्तमीहा दिवस ऋतू बदलून वसंत ऋतू आणि कापणीचा हंगाम सुरू होण्याचे प्रतीक आहे. बहुतेक भारतीय शेतकऱ्यांसाठी ही नवीन वर्षाची शुभ सुरुवात आहे. हा सण सर्व हिंदू त्यांच्या घरात आणि सूर्याला समर्पित असलेल्या असंख्य मंदिरांमध्ये साजरा केला जातो. या शुभ प्रसंगी रांगोळी काढली जाते, तर चिंता करू नका आम्ही तुमच्या साठी काही हटके रांगोळी डिझाईन घेऊन आलो आहोत.
रथ सप्तमीला काढता येतील अशा सुंदर रांगोळी डिझाईन:
हिंदू धर्माच्या वेदांमध्ये सूर्य उपासना खोलवर रुजलेली आहे आणि त्याची प्राचीनता चीन, इजिप्त आणि मेसोपोटेमियासारख्या जगातील अनेक पौराणिक कथांशी संबंधित आहे. दरम्यान, आजचा खास दिवस तुम्ही दारापुढे सुंदर रांगोळी काढून आणखी खास बनवू शकता.