इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र व महत्वाच्या अशा रमजान (Ramadan) महिन्यातील शेवटचे पर्व सध्या सुरु आहे. ईद अवघ्या दोन दिवसांवर आली असताना, या उत्सवाची तयारी मुस्लीम बांधवांकडे सुरु झाली आहे. गेले एक महिना रोजे, उपवास, कुराण पठन, प्रार्थना अशा भक्तिमय वातावरणात हा रमजानचा महिना व्यतीत झाला आहे. रमजानच्या पाक महिन्यात, सकाळी 'सेहरी' (Sehri) पासून रोजा सुरु होतो व संध्याकाळी इफ्तार (Iftar) सह तो सोडला जातो. रोजाचा अर्थ फक्त भुकेलेला आणि तहानलेला राहणे असा नाही, तर या काळात डोळे, कान आणि जीभ देखील उपवास करतात. याचा अर्थ- वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका किंवा वाईट बोलू नका.
तर चला जाणून घेऊया या पवित्र महिन्यातील 23 मे रोजीच्या विविध शहरांमधील सेहरी आणि इफ्तारच्या वेळा.
> मुंबई -
सेहरी वेळ - 04:40
इफ्तार वेळ - 19:10
> पुणे -
सेहरी वेळ - 04:38
इफ्तार वेळ - 19:08
> कोल्हापूर -
सेहरी वेळ - 04:41
इफ्तार वेळ - 19:03
> औरंगाबाद -
सेहरी वेळ - 04:28
इफ्तार वेळ - 19:05
> नागपूर -
सेहरी वेळ - 04:10
इफ्तार वेळ - 18:51
> नाशिक -
सेहरी वेळ - 04:34
इफ्तार वेळ - 19:11
दरम्यान, रमजान हा अत्यंत पवित्र, समाजाचे कल्याण करणारा, सहसंवेदना जागवणारा, सुख-शांती-समाधानाचा संदेश देणारा, वाईट कर्मांपासून दूर ठेवणारा, दानधर्माचे महत्त्व अधोरेखित करणारा रमझानचा महिना आणि ईद-उल-फित्रचा सण आहे. रमझान संपल्यावर येणाऱ्या बीजेच्या दिवशी ईद-उल-फ़ित्र ऊर्फ रमझान ईद साजरी होते.
सध्या देशावर कोरोना विषाणूचे संकट आहे, सामुदायिक प्रार्थना बंद आहेत. लोक आपापल्या घरीच कुराणचे पठन, रोजा ठेवणे, प्रार्थना करणे अशी धार्मिक कृत्ये करत आहेत. ईदचा सणदेखील अशाच परिस्थितीमध्ये घरगुती स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.