Gift For Raksha Bandhan: यंदाच्या रक्षाबंधन सणाला बहिणीला काय गिफ्ट द्यायचे याचा विचार करत असाल तर आजघडीला स्मार्टफोन हे त्यासाठीचा चांलला पर्याय आहे. म्हणूनच आज आम्ही आपल्याला काही स्मार्टफोनचे पर्याय सूचवू इच्छितो. जे तुम्ही आपल्या बहिणीला देऊन तिला खूश करु शकता. किमतीचे म्हणाल तर, हे स्मार्टफोन (Smartphone) शक्यतो 20 हजार रुपयांच्या खालीच आहेत. बदलत्या काळासोबत सणासोबत भावाकडून मिळणाऱ्या गिफ्टचा प्रकारही बदलला. पुर्वी साडी-चोळी किंवा एखादा ड्रेस, पैशाचे पाकीट असे काहीतरी गिफ्ट भावाकडून बहिणीला मिळायचे. पण, आता गिफ्टचे अनेक प्रकार पुढे आले. ज्यात स्मार्टफोन आघाडीवर आहे. जाणून घ्या बहिणीला गिफ्ट करण्यासाठी स्मार्टफोनचे हे काही खास पर्याय.
टेक्नो फँटम 9
टेक्नो या चीनी कंपनीने नुकताच आपला टेक्नो फँटम 9 हा स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला. या फोनच्या फिचर्सबाबत बोलायचे तर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. 6 जीबी रॅम आण 128 जीबी स्टोरेजवला सिंगल व्हेरीएंट मध्ये हा फोन लॉन्च करण्यात आला आहे. मार्केटमध्ये याची किंमत 14999 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये फ्रंट पॅनल ड्युअल फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.
टेक्नो फँटम 9 इतर फिचर्स
6.4-इंच FHD+ एमोलेड स्क्रीन (एस्पेक्ट रेशो 19.5:9)
डिस्प्ले रिजोल्यूशन 1080 X 2340 पिक्सल्स
3D बॅक कव्हर
32 मेगापिक्सल AI सेल्फी कॅमेरा
ट्रिपल रिअर कॅमेरा 16MP + 8MP + 2MP सेटअप
रिएलमी एक्स
रिएलमी एक्स हा फोनही आपल्या वैशिष्य्यांमुळे चर्चेत आहे. त्याची फिचर्स पुढील प्रमाणे
6.53 इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले
गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन
कलर ओएस 6 वर आधारीत एंड्रॉयड 9 ऑपरेटिंग सिस्टम
ड्युअल कॅमेरा सेटअप (सोनी सेन्सरवाला 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा)
5 मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा (16 मेगापिक्सल पॉप-अप कॅमेरा मॉड्यूल )
3,765 एमएएच बैटरी
4 जीबी+128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट
किंमत - 16,999 रुपए आणि 8 जीबी+128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपए इतका आहे.
सैमसंग गॅलेक्सी एम40
फुल एचडी प्लस इन्फिनीटी-ओ डिस्प्ले, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि ऑक्टाकोर स्नैपड्रैगन 675 प्रोसेसर आदी गोष्टींमुळे हा स्मार्टफोन चर्चेत आहे. त्याची फिचर्स अशी..
स्क्रीन साउंड टेक्नॉलॉजीचा वापर
एंड्रॉयड 9.0 ऑपरेटींग सिस्टमवर आधारीत
स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन
ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप (32 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा)
5 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर सेकेंडरी कॅमेरा
अल्ट्रा-वाइड व्ह्यू अँगलसाठी 8 मेगापिक्सल तीसरा कॅमेरा
मोटोरोला वन व्हिजन
हा एक वेगळ्याच प्रकारचा मोबाईल आहे. जो केवळ 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजवाल्या सिंगल व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याच्या फिचर्सबाबत बोलायचे तर ते पुढील प्रमाणे
25 मेगापिक्सल पंच होल सेल्फी कॅमेरा
ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप (48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेन्सर सोबत 5 मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा सेटअप)
6.3 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले (1080 x 2520 पिक्सल रेजोल्यूशन )
2.2GHz एक्सीनोस ऑक्टाकोर प्रोसेसर
4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज (माइक्रो एसडी कार्ड ने 512 जीबी पर्यंत वाढविण्याची क्षमता )
किंमत 19,999 रुपए
रेडमी नोट 7 प्रो
फिचर्स
6.3 इंच की एलसीडी डिस्प्ले ( फुल एचडी प्लस रिजॉल्यूशन सपोर्ट)
गोरिल्ला ग्लास 5 से प्रोटेक्शन
नेप्च्यून ब्लू, नेब्युला आणि स्पेस ब्लॅक कलर वैरिएंटमध्ये उपलब्ध
रिअर पैनल मध्ये 48+5 मेगापिक्सल का ड्युअल रिअर कॅमेरा
प्रायमरी सेन्सर सोनी IMX586
13 मेगापिक्सल एआई सेल्फी कॅमेरा (एआई पोर्ट्रेट सेल्फी, स्टूडिओ लाइटिंग सेल्फी, एआय फेस अनलॉक, एआय ब्यूटीसारख्या फीचर्ससह) (हेही वाचा Raksha Bandhan 2019 Wishes: रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यासठी खास मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status)
बऱ्याच वर्षांनतर यंदा दुर्मिळ योगायोग आला आहे. स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन असा दुहेरी मोका प्रेम व्यक्त करण्यासाठी देशभरातील बंधू भगीनींना मिळणार आहे. देशभरातील बहिणी आज आपल्या भावाला राखी बांधतील. रक्षाबंधनलाला बहिणीने भावाला राखी बांधायची आणि भावाने बहिणीला घ्यायचे एक खास असे गिफ्ट. काळानुरुप राख्यांची पद्धत, त्यांचा आकार, सणाची शैली बऱ्याच पद्धतीने बदलली. पण, बहिण भावातील प्रेम मात्र आजही तसेच आहे.