President Ram Nath Kovind आज भारताच्या 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करणार; कधी, कुठे पहाल त्यांचं भाषण Live?
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Photo Credits: PTI/File)

President's Address to Nation Live Streaming: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) आज भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता त्यांचा संदेश प्रक्षेपित केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून आणि दूरदर्शन वरून हिंदी, इंग्रजी प्रमाणेचे दूरदर्शनवर प्रादेशिक भाषांमध्ये नागरिकांना हा संदेश ऐकता-पाहता येणार आहे.

टेलिव्हिजन प्रमाणे सोशल मीडीयामध्येही त्याचं ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे. डीडी न्यूजच्या युट्युब चॅनेल वरून ते पाहता येईल. ऑल इंडिया रेडिओ प्रादेशिक भाषेमधील ब्रॉडकास्ट रात्री 9.30 च्या सुमारास प्रदर्शित करणार आहेत. 7 वाजता लाईव्ह भाषण ऐकण्यासाठी पाहण्यासाठी डीडी न्यूज युट्युब चॅनेल, पीआयबी इंडियाचं युट्युब चॅनल याला भेट देता येऊ शकते. या भाषणात राष्ट्रपती देशसमोरील आव्हानं आणि महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकतील. हे देखील नक्की वाचा: Happy Republic Day 2022 Wishes, Patriotic Quotes and HD Images: भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी WhatsApp स्टिकर्स, 'जय हिंद' HD प्रतिमा, टेलिग्राम संदेश, सिग्नल ग्रीटिंग्ज आणि Facebook GIF.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद लाईव्ह स्ट्रिमिंग (President's Address to Nation Live Streaming)

भारत यंदा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. परंतू यावर्षी देखील देशावर कोविड 19 चं संकट असल्याने कार्यक्रम मोजक्याच लोकांमध्ये आणि मर्यादित स्वरूपात असेल. 144 वरून यंदा 96 ट्रुपचं संचलन होणार आहे.