PL Deshpande Marathi Quotes: पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, पु ला देशपांडे (PL Deshpande) म्हणून लोकप्रिय आहे. देशपांडे हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. होय पुलंवर महाराष्ट्राचं (Maharashtra) कालही प्रेम होतं आणि आजही आहे आणि उद्याही राहिल. याचं कारण त्यांची खुमासदार शैली. त्यांचा आज विसावा स्मृतीदिन. प्रख्यात मराठी लेखक, व्यंगचित्रकार, विनोदकार, वक्ते, संगीतकार आणि पटकथा-लेखक यांनी मराठी आणि भारतीय साहित्याच्या जगात कायम टिकणारा वारसा सोडला आहे. या महान लेखकामुळे आज महाराष्ट्राच्या साहित्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भाषेवरील त्यांचे विशेष प्रभुत्व होत. त्यांची अनेक नाटकं प्रसिद्ध होती, त्यांचं लिखाण हे विनोदी होत आणि लिखाणातुम ते आपलं विनोदी व्यक्तित्व दाखवून द्यायचे. आजच्या लेखात आपण त्यांच्या काही महत्वपूर्ण Quotes पाहणार आहोत ज्यांना वाचून एक हसत-हसत आपणास जीवनाची शिकवणही मिळेल.
देशपांडे यांचा जन्म मुंबईतील कुरपाल हेमराज चाळ येथील गावदेवी भागात लक्ष्मण त्र्यंबक देशपांडे आणि लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे झाला. केवळ त्यांच्या नावाचा उल्लेख केल्याने वाचकांच्या आणि जनतेच्या चेहऱ्यावर हास्य उमटायचे त्यामुळे त्यांना "महाराष्ट्राचा सर्वात प्रिय" ही पदवी देण्यात आली. पाहा पु. ल यांचे Quotes:
“माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील पण माणूस हा गेलेली केस नसावा.”
“चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता ह्याच्यावर ते अवलंबून आहे, तुम्ही जर एखाद्याच मन चोरल तर त्यात वाईट काय आहे.”
“मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रांपेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आठवते.”
“प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.”
“खरं तर सगळे कागद सारखेच… त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.”
“जुन्यात आपण रंगतो... स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या!”
छान आहेत ना! हे विचार वाचून आपल्याला आनंद येईलच पण भाषेवर प्रभुत्व असलं की किती छान पद्धतीने आपले विचार आपण अशा माध्यमातून आपण मांडू शकतो हेही कळते. दरम्यान देशपांडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुलंचे हस्ताक्षर आता डिजिटल फॉन्टमध्ये पाहावयास मिळणार आहे. समाजमाध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘बी बिरबल’ संस्थेच्या गंधार संगोराम यांनी निर्मिती केलेल्या या डिजिटल फॉन्टचे पुलंच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (12 जून) अनावरण करण्यात येणार आहे.