Navratri in Pakistan (Photo Credits- Twitter)

गेले नऊ दिवस संपूर्ण भारतात गरबा आणि दांडियाच्या जल्लोषात तरुणाई थिरकताना दिसत आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तर काहींनी आपल्या घरीही घट बसवले आहेत.

विशेष म्हणजे देवीचा हा सोहळा फक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तानातही तितक्याच जल्लोषात साजरा केला जातो.

पाकिस्तान मधील कराची शहरातील गणेशोत्सव खूपच प्रसिद्ध आहे, पण त्यासोबतच तेथील लोक नवरात्र सण देखील तितक्याच भक्तिभावाने साजरा होतो.

कराची येथे अनेक ठिकाणी दरवर्षी मोठ्या श्रद्धेने देवीची प्रतिष्ठापना करून पूजा करण्यात येते. दांडिया आणि गरब्याचे देखील कराचीमध्ये अनेक ठिकाणी आयोजन करण्यात येते.

हा पहा व्हिडिओ

हा व्हिडिओ आहे, काराचीमधील श्री स्वामीनारायण मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवाचा. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात येथे आपल्याला दांडिया खेळताना दिसत आहे.