Pandharpur Vitthal Rukmini Live Darshan: आषाढी एकादशीला JIO TV App देणार विठ्ठल रूक्मिणीचं 24 तास लाईव्ह दर्शन
विठ्ठल रुक्मिणी, पंढरपूर (Photo Credits-Facebook)

कोरोना संकटामुळे मागील 2 वर्ष कडक नियमावली पाळत वारकर्‍यांनी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये आषाढी वारी केली. मात्र यंदा चित्र पालटलं आहे. आता कोविड 19 ची नियमावली नसल्याने भाविकांमध्ये यावर्षी आषाढी वारीचा विशेष उत्साह आहे. यंदा पंढरपूरामध्ये आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) विक्रमी गर्दी होण्याचा देखील अंदाज आहे. मग अशावेळी तुम्हांला विठ्ठल रूक्मिणी चं दर्शन प्रत्यक्षात जाऊन घेणं शकलं नसलं तरीही यावर्षी देखील ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. यासाठी तुम्हांला JIO TV App मदत करणार आहे. जिओ टीव्हीच्या माध्यमातून सध्या जगभरातील माऊलींच्या भक्तांना दर्शन मोफत होणार आहे.

1 जुलैपासून विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन 24 तास खुलं झालं आहे. त्यामुळे भाविकांची मंदिरातही गर्दी वाढली आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नी यंदा आषाढीला विठ्ठल रूक्मिणीची पूजा करणार आहेत.

कुठे घ्याल विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन?

पंढरपूर विठ्ठल-रूक्मिणी दर्शन ऑनलाईन घेण्यासाठी तुम्ही या डिरेक्ट लिंक ला देखील भेट देऊ शकता.

जिओ टीव्हीवरून विठ्ठल रूक्मिणीचं ऑनलाइन दर्शन घेण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये जिओ टीव्ही अ‍ॅप (JIO TV App) डाउनलोड करावे लागणार आहे. सोबतच क्यू आर कोड स्कॅन करून देखील लाईव्ह दर्शन घेता येईल.

जिओ टीव्ही अ‍ॅप डाउनलोड केल्यावर लाईव्ह दर्शन घेण्यासाठी भाविक 'दर्शन' आयकॉन वर क्लिक करा. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी चॅनेलवर जा. याच ठिकाणी तुम्हाला विठू माऊलीचं ऑनलाइन दर्शन घेता येईल.