Ugadi Messages in Telugu: चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला हिंदू नववर्षाला सुरुवात होते. गुढीपाडव्याला तेलगूमध्ये उगादी म्हटलं जातं. गुढीपाडव्याचा अर्थ 'विजय ध्वज' असा आहे. त्याचप्रमाणे उगादी हे नाव मुळात युग आणि आदि या संस्कृत शब्दापासून आले आहे, ज्याचा अर्थ नवीन युगाची सुरुवात असा होतो. त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग हे तीन प्रकारचे युग आहेत.
भारतातील दक्षिणेकडील प्रांतीय राज्य आंध्र प्रदेश आणि कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांमध्ये उगादी सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. कन्नड आणि तेलगू समुदायातील लोक उगादीचा सण नवीन वर्ष म्हणून साजरे करतात. आम्ही तुमच्यासाठी उगादी सणाच्या निमित्त काही Ugadi Greetings, Ugadi Images, Ugadi SMS, Ugadi HD Wallpapers, Ugadi WhatsApp Messages घेऊन आलो आहोत. तुम्ही हे संदेश सोशल मीडियाद्वारे शेअर करून आपल्या मित्र-परिवारास खास तेलगू भाषेत शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Happy Gudi Padwa 2023 Wishes In Marathi: गुढी पाडव्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Messages द्वारा शेअर करत द्विगुणित करा नववर्षाचा आनंद)
पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. या दिवशी सूर्य पहिल्यांदाच उगवला होता. म्हणूनच या दिवसाला जगाचा पहिला दिवस म्हणतात. म्हणूनच लोक या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरे करतात.