
मराठी नववर्ष अर्थात चैत्र पाडवा (Chaitra Padwa) यंदा 22 मार्च दिवशी साजरा केला जाणार आहे. मराठी नववर्षाची सुरूवात गुढी पाडवा (Gudi Padwa) हा सण साजरा करून केली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस मराठी नववर्षाचा पहिला दिवस असतो. या दिवशी मराठी बांधव घरावर गुढी उभारून हा आनंदाचा दिवस साजरा करतात. मग या दिवसाचा आनंद सोशल मीडीया द्वारा देखील द्विगुणित करण्यासाठी तुम्ही मराठमोळी शुभेच्छापत्र, मेसेजेस, Wishes, Quotes, WhatsApp Status, Facebook Messages शेअर करून मित्रमंडळी, नातेवाईकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊ शकता.
यंदा गुढी पाडवा पासून शालिवाहन शके 1945 ची सुरूवात होणार आहे. त्यामुळे या नव्या हिंदू वर्षाचं स्वागत दणक्यात करण्यासाठी अनेक ठिकाणी शोभा यात्रा काढल्या जातात. रांगोळ्याच्या गालिचांनी रस्ते फुलतात. घराघरात गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यानिमित्ताने सारे कुटुंब एकत्र येऊन हा सण साजरा करतात. मग तुमच्यापासून दूर असलेल्यांसोबत गुढीपाडवा साजरा करण्यासाठी हे मेसेज त्यांच्यापर्यंत नक्की पोहचवा आणि त्यांना आनंदामध्ये सहभागी करून घ्या. नक्की वाचा: Gudi Padwa 2023: गुढीपाडव्यानिमित्त गुढी कशी उभारावी? गुढी उभारण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात? आणि त्याचं महत्त्व काय? जाणून घ्या .
गुढीपाडवा सणाच्या शुभेच्छा

घरोघरी शोभेल जशी उंच गुढी
तशीच तुमच्या आयुष्यात येवो
आनंदाची गोडी
गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

काळोख्या रात्रीला सोनेरी किरणांचा स्पर्श
आपल्या जीवना नांदो कायम सुख, समाधान अन हर्ष
गुढी पाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!


गुढी प्रेमाची उभारूया मनी
औचित्य शुभ मुहूर्ताचे करूनी
विसरूनी जावो दु:ख सारे
स्वागत करू नववर्षाचे!

वसंताची पहाट घेऊन आली
नवचैतन्याचा गोडवा
आनंदमय वातावरणात
साजरा करू आज गुढी पाडवा!
गुढी पाडवा सणापासून चैत्र नवरात्रीची देखील सुरूवात होते. पुढील नऊ दिवस नवरात्र साजरी केली जाते. चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी श्रीराम नवमी साजरी करून या मंगलमय पर्वाची सांगता केली जाते. शारदीय नवरात्रीप्रमाणे काही घरात चैत्र नवरात्रीमध्येही घटस्थापना केली जाते. या निमित्ताने देवीचा जागर केला जातो.