
Sant Gadge Baba Jayanti 2025 Quotes: संत गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. संत गाडगे महाराज एक भारतीय भिक्षू-संत आणि समाजसुधारक होते. समाजातील अंधश्रद्धा रोखण्यात गाडगे महाराजांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला. संत गाडगे बाबा स्वत: हातात झाडून घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करत असतं. गाडगे महाराजांनी गायींची कत्तल थांबवण्यासाठी त्यांनी विदर्भात गोरखन केंद्र बांधले. अपंग आणि गरिबांसाठी अन्नदान केंद्रे सुरू केली. ज्या वृद्धांना राहण्यासाठी जागा नव्हती त्यांच्यासाठी त्यांनी घरे बांधली. कुष्ठरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांच्या उन्नतीसाठीही त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
आज संत गाडगे महाराजांची जयंती (Sant Gadge Baba Jayanti 2025) देशभरात साजरी होत आहे. संत गाडगेबाबा यांनी सांगितलेले विचार आजही तरुण पिढीसाठी प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे आज त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअॅपवर स्टेट्स द्वारे संत गाडगे बाबांचे प्रेरणादायी कोट्स शेअर करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करू शकता.
संत गाडगे बाबा प्रेरणादायी विचार -
गाडगे महाराजांच्या हातात नेहमी एक मातीचे कटोरे किंवा गाडगे असायचं. त्यामुळे लोक त्यांना गाडगे महाराज असं म्हणायचे. त्यांनी जातिव्यवस्थेतील कठोरता, अंधश्रद्धा, स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेचा संदेश दिला. आजही त्यांचे विचार प्रत्येकासाठी महत्त्वाचे ठरत आहेत.