Mahashivratri 2025 Wishes in Marathi 6 (फोटो सौजन्य - File Image)
Mahashivratri 2025 Wishes in Marathi: दरवर्षी महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2025) सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा दिवस खूप पवित्र मानला जातो. या दिवशी शिव आणि शक्तीचे एकत्रीकरण झाले होते. म्हणजेच, या दिवशी महादेव आणि माता पार्वतीचा विवाह झाला. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव यांनी विवाहित जीवन स्वीकारले. असे मानले जाते की, जो कोणी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करतो आणि भगवान शिवाचा अभिषेक करतो. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
यंदा महाशिवरात्रीचे व्रत बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी शिवभक्त एकमेकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील सोशल मीडियाद्वारे खालील Messages, Greetings पाठवून तुमच्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील महाशिवरात्री ग्रीटिंग्ज मोफत शेअर करू शकता.
महाशिवरात्रीच्या मराठी शुभेच्छा -
शिव सृजन आहेत, शिव विनाश आहेत
शिव मंदिर आहेत, शिव स्मशान आहेत
शिव आदि आहेत आणि शिव च अनंत आहेत
ओम नमः शिवाय
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Mahashivratri 2025 Wishes in Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)
शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची होवो एक नवी आणि चांगली सुरुवात,
हीच शंकराकडे प्रार्थना…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Mahashivratri 2025 Wishes in Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)
सर्व जग ज्याच्या शरणी आहे..
त्या भगवान शंकराला नमन आहे,
भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ,
चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…
हर हर महादेव!
शुभ महाशिवरात्री!

Mahashivratri 2025 Wishes in Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)
भगवान शंकराची महिमा आहे अपरंपार
शिव करतात सर्वांचा उद्धार
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो
भगवान शंकर तुमचे आयुष्य आनंदाने भरो.
महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा..!

Mahashivratri 2025 Wishes in Marathi 4 (फोटो सौजन्य - File Image)
शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahashivratri 2025 Wishes in Marathi 5(फोटो सौजन्य - File Image)
पौराणिक मान्यतांनुसार, महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या दिवशी दिवसभर उपवास पाळला जातो.