Haldi Kunku Invitation Marathi Messages Format (PC - File Image)

Haldi Kunku Invitation Marathi Messages Format: गेल्या आठवड्यात नुकताचं मकर संक्रांतीचा (Makar sankranti 2024) सण पार पडला. या सणाला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे. विशेषत: विवाहित महिलांसाठी हा सण खूप खास असतो. या सणानिमित्त महिला हळदी-कूंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात. या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजिक करण्यात येतात. रथ सप्तमी हा ऋतू बदलून वसंत ऋतू आणि कापणीचा हंगाम सुरू होण्याचे प्रतीक आहे.

तुम्ही देखील तुमच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला असेल, तर तुमच्यासाठी आम्ही खास निमंत्रण पत्रिकाचे नमुने घेऊन आलो आहोत. तुम्ही या निमंत्रम पत्रिका WhatsApp Messages, Images च्या माध्यमातून तुमच्या मैत्रिणींना पाठवू शकता. (वाचा - Makar Sankranti 2024 Ukhane: मकर संक्रांती आणि हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी खास मराठी उखाण्यांची यादी)

हळदी कुंकू कार्यक्रमासाठी खास 'निमंत्रण पत्रिका' - 

काय मग येताय ना?

चला सयांनो संस्कृती जपू..

रथसप्तमीच्या मुहूर्तावर आयोजित

हळदी कुंकू कार्यक्रमासाठी आमच्या घरी अगत्याने येणे करावे..

तारीख:

वेळ:

पत्ता:

Haldi Kunku Invitation Marathi Messages Format (PC - File Image)

लेडीज अँड लेडीज

एकदा किटी पार्टी पेक्षा

हळदी कुंकू समारंभात भेटू

कुठे?:

कधी?:

काय मग येताय ना?

Haldi Kunku Invitation Marathi Messages Format (PC - File Image)

साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात

हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!

आमचे येथे दि. .... रोजी साय॑काळी .. वाजता

हळदी कुंकू आयोजिले आहे.

अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...

पत्ता:

Haldi Kunku Invitation Marathi Messages Format (PC - File Image)

हास्याचे हलवे , तीळ गुळाची खैरात

लुटून वाण, साजरा करू सण उत्साहात

रथसप्तमीच्या या शुभ मुहूर्तावर

आमच्या घरी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे.

आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी..

तारीख:

वेळ:

पत्ता:

Haldi Kunku Invitation Marathi Messages Format (PC - File Image)

विसरुनी सारी कटुता

नात्यात तीळगुळाचा गोडवा यावा

एकमेकांच्या साथीने हा आनंदाचा सोहळा रंगावा

दिनांक.. रोजी एकत्र भेटून

हळदी कुंकू करण्याचे योजिले आहे. याकरिता आग्रहाचे आमंत्रण..

पत्ता -

Haldi Kunku Invitation Marathi Messages Format (PC - File Image)

हळदी कुमकुमचा सण मकर संक्रांती सणाच्या दिवसापासून सुरू होतो आणि माघ महिन्यात साजऱ्या होणाऱ्या रथ सप्तमीपर्यंत चालू राहतो.