Makar Sankranti 2024 Ukhane (PC - File Image)

Makar Sankranti 2024 Ukhane: यंदा १५ जानेवारी ला सर्वत्र मकर संक्रातीचा (Makar Sankranti 2024) सण साजरा करण्यात येणार आहे. हिंदू धर्मात या सणाला अतिशय महत्त्व आहे. मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण भगवान सूर्याच्या उपासनेला समर्पित आहे. या दिवशी भक्त भगवान सूर्याची उपासना करून आशीर्वाद घेतात, हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आणि नवीन पिकांची काढणी दर्शवितो. या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो.

शास्त्रात उत्तरायणाच्या वेळेला देवांचा दिवस आणि दक्षिणायनला देवांची रात्र म्हटले आहे. मकर संक्रांत ही एक प्रकारे देवांची सकाळ आहे. या दिवशी स्नान, दान, जप, तपश्चर्या, श्राद्ध आणि कर्मकांड यांचे खूप महत्त्व आहे. याशिलाव मकर संक्रातीचा सण खासकरून विवाहित महिलांसाठी खास असतो. या दिवशी सौभाग्यवती महिला खास साज-शृंगार करतात आणि एकमेकींना वान देतात. तसेच मकर संक्रांती निमित्त हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते. या दिवशी महिला खास उखाणे घेतात. तुम्हाला या दिवशी सर्वांपैक्षा आगळा-वेगळा उधाणा घ्यायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास उखाणे घेऊन आलो आहोत. (हेही वाचा - Makar Sankranti 2024 Bornahan: बाळाचं बोरन्हाण कसं करतात? जाणून घ्या यंदाच्या तारखा आणि बोरन्हाण करण्याची पद्धत!)

मकर संक्रांतीसाठी खास उखाणे -

  • तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान…

    …रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण.

  • तिळाच्या लाडू सोबत देते काटेरी हलवा…

    …..चे नाव घेते त्यांना लवकर बोलवा.

  • संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात,

    ….रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात.

  • रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास

    …रावांचे नाव घेते संक्रांतीला खास.

  • सण पहिला मकरसंक्रांतीचा

    मान हळदी कुंकवाचा

    मान सुहासिनीचा आणि

    ….चा जोडा राहो साताजन्माचा

  • संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वान,

    ….राव मुळे मिळाला मला सौभाग्याचा मान.

  • मोत्याची माळ सोन्याचा साज

    …रावांच नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज.

  • संक्रांतीच्या सणाला सुगड्याचा मान

    …रावांच्या नावावर देते हळदी कुंकाचा कुंकाच वान.

  • संसार रुपी करंजीत प्रेम रुपी सारण

    …रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकू चे कारण.

  • गुलाबाचे फूल लावते वेणीला

    _____रावांची आठवण येत प्रत्येक क्षणाला.

  • गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी,

    _____रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या वेळी.

मकर संक्रांतीला धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यानंतर दान करणे शुभ मानले जाते. तसेच मकरसंक्रांतीच्या दिवशी खरमास संपतो आणि महिनाभर बंदी घालण्यात आलेली शुभ कार्ये पुन्हा सुरू होतात. मकर संक्रांतीचे केवळ धर्मातच नव्हे तर विज्ञानातही मोठे महत्त्व आहे.