 
                                                                 Gauri Pujan Rangoli Design: ज्येष्ठा गौरी आवाहन हा तीन दिवसांचा सण असून विवाहित महिला हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. विवाहित स्त्रिया या दिवशी गौरीला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात. ज्येष्ठा गौरी आवाहन पूजा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला म्हणजेच उद्या 10 सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे. यंदा उद्या म्हणजेचं मंगळवारी ज्येष्ठा गौरीचे आगमन होणार आहे.
हिंदू धर्मात कोणत्याही सणाला रांगोळीचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गौरी आवाहनाच्या दिवशी घरासमोर, मंदिरासमोर रांगोळी काढल्याने या सणाचा आनंद आणखी द्वगुणित होईल. तुम्हालाही गौरी आवाहनाच्या दिवशी खास रांगोळी काढायची असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही आकर्षक आणि अगदी सोप्या गौराईच्या रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. तुम्ही खालील व्हिडिओ पाहून या रांगोळी डिझाईन्स काढू शकता. (हेही वाचा - Gauri Aagman Rangoli Design: गौरी आगमनाच्या दिवशी घरासमोर, अंगणात काढा 'या' खास रांगोळी डिझाईन्स, पहा व्हिडिओ)
गौरी पूजन आणि गौरी आगमान स्पेशल रांगोळी डिझाईन, पहा व्हिडिओ -
गौरी आवाहनाच्या दिवशी लोक गौरीची मूर्ती घरी आणतात. गौरी आवाहनाच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरीचे पूजन केले जाते. तसेच तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. या दिवशी देवी गौरी कैलास पर्वतावर परत येते, असं म्हटलं जातं.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
