 
                                                                 Gauri Aagman Rangoli Design: ज्येष्ठा गौरी आवाहन (Jyeshtha Gauri Avahan) हा महाराष्ट्रात साजरा होणारा एक महत्त्वपूर्ण उत्सव आहे. विशेषत: मराठी लोक हा सण साजरा करतात. विवाहित स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि गौरीची पूजा (Gauri Puja) करतात. ज्येष्ठा गौरी आवाहन पूजा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला म्हणजेच आज 10 सप्टेंबर रोजी साजरे करण्यात येत आहे.
ज्येष्ठा गौरीचे पूजन केल्याने विवाहित जोडप्यांला वैवाहिक आनंद आणि सुख समृद्धी प्राप्त होते. विशेषत: महिलांचा या उत्सवात सहभाग असतो. या दिवशी घरात ज्या ठिकाणी गौरीची प्रतिष्ठापना करायची आहे, तेथे खास सजावट केली जाते. घरासमोर, अंगणात आणि गौरीसमोर खास रांगोळी काढली जाते. तुम्हाला देखील गौरी आवाहनासाठी घरासमोर किंवा अंगणात रांगोळी काढायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. (हेही वाचा - Gauri Saree Draping: गौराईला साडी कशी नेसावी? पहा साडी नेसवण्याची सोपी पद्धत (Watch Videos))
गौरी आगमनाच्या दिवशी घरासमोर, अंगणात काढा 'या' खास रांगोळी डिझाईन्स, पहा व्हिडिओ -
तुम्ही घराच्या प्रवेशद्वारावर गौरीच्या चरणांची रांगोळी काढू शकता. गौरी आवाहन पूजनाच्या दिवशी महिला सोळा प्रकारचे विविध पारंपरिक पदार्थ तयार करतात आणि पारंपारिक गाणी आणि भजने गातात.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
