Navratri 2019: सामान्य स्त्रीचे असामान्य सामर्थ्य दर्शवणारा नवशक्तीचा जागर; नक्की पहा Latestly Marathi Youtube Page वर (EXCLUSIVE)
Navshakticha Jagar (Photo Credits: File Image)

Navshakticha Jagar: आई. ताई. सखी .पत्नी. नानाविध रूपांच्या पलीकडे जगणाऱ्या  अनेक जणी आपण रोज पाहतो. स्वयंपाक घरापासून ते ऑफिसच्या केबिन पर्यंत आपल्या कर्तबगारीचे ठसे उमटवत आजवर अनेक सामान्य महिलांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या महिलांच्या परिश्रमांना कौतुकाची थाप देण्यासाठी आम्ही लेटेस्टली मराठीच्या वतीने नवशक्तीचा जागर हा उपक्रम सुरु करत आहोत. उद्या (29 सप्टेंबर) पासून नवरात्रीच्या (Navratri 2019) निमित्त सर्वत्र देवीरुपी स्त्रीचा सन्मान करण्याचा सोहळा सुरु होईल, हेच औचित्य साधून आम्ही आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सामान्य स्त्रियांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही असामान्य सामर्थ्यशाली महिलांशी आपली भेट घडवून देणार आहोत. Latestly Marathi Youtube Page वर तुम्हाला हा खास उपक्रम पाहता येणार आहे.

नवशक्तीचा जागर या कार्यक्रमातून उद्या (29 सप्टेंबर) पासून दर दिवशी सकाळी 9 वाजता आम्ही आपल्यासमोर एका स्त्रीचा प्रवास मांडणार आहोत. हृदयस्पर्शी, प्रेरणादायी अशा साऱ्या विशेषणांची सार्थ पटवून देणारे असे हे प्रवास आहेत. चला तर मग यामध्ये सहभागी महिलांची एक थोडक्यात ओळख करून घेऊयात..

1) पूजा देशमुख- लेखिका

नोकरी करणारी सामान्य महिला ते एका बेस्ट सेलर पुस्तकाची लेखिका असा पूजा यांचा प्रवास आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेताना इतरांना प्रेरणा देईल असे पुस्तक पूजा यांनी लिहिले आहे.

2) अनिषा शिंदे- फोटो जर्नालिस्ट

पतीच्या साथीने पत्रकारितेची नोकरी करणाऱ्या अनिषा या एका वर्किंग वुमनचे आदर्श उदहारण आहे. अपघाताने आणि अनपेक्षितपणे या क्षेत्रात आलेल्या अनिषा यांचा प्रवास खूपच रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे. आपल्या कॅमेऱ्याने अनेक क्षण टिपताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी मांडले आहेत

3) कविता सावंत- रगडा पाव विक्रेती

चिंचपोकळी स्टेशन च्या बाहेर रगडा पाव विकून आपले घर चालवणाऱ्या कविता सावंत आज कविता ताई म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेकांच्या जिभेचे चोचले आणि पोटाची भूक भागवत त्यांनी आपल्या घराला आधार दिला आहे.

4)विजया हांदे- मॉलिश करणाऱ्या मावशी

लहानग्यांना मॉलिश करून आंघोळ घालणाऱ्या विजया मावशी यांचा आर्थिक गरजेतून सुरु झाला.स्त्रीची ओळख मानल्या जाणाऱ्या ममता व वात्सल्याने त्यांनी आजवर ५०० हुन अधिक मुले सांभाळली आहेत.

5) सीमा खंडाळे- सामाजिक कार्यकर्त्या

अशय सोशल ग्रुप आणि ऋतू कप सारख्या अनोख्या उपक्रमातून मागील काही वर्षांपासून सीमा या पर्यावरण बचाव मोहिमेसाठी काम करत आहेत. प्लास्टिक पिशव्या आणि मासिक पाळीत वापरले जाणारे प्लास्टिक पॅड यांचा वापर घटवण्यासाठी त्यांनी पर्याय निर्माण कार्याला सुरुवात केली आहे.

6) वैदही अंकोलेकर- बस कंडक्टर

क्रिकेटर अथर्व अंकोलेकर याची आई व बस कंडक्टर वैदेही यांनी पतीच्या निधनानंतर खचून न जाता आपल्या घराचा आर्थिक डोलारा सांभाळला. बस कंडक्टरम्हणून काम करताना आलेले अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केले आहेत.

7) दर्शना पवार-चवरे - कुकीज स्पेशालिस्ट

आपल्या आवडीला करिअरचे रूप देत पुण्यात कुकीज आणि केकचं एक दुकान चालवत दर्शना यांनी एक पायंडा रचला आहे.क्रिएटिव्हिटी आणि हिंमत यांचा मेळ घालून दर्शना आज एक प्रसिद्ध उद्योजिका आहेत.

8) सुनीता गायकवाड- रिक्षा चालिका

पुरुषप्रधान काम म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या व्यवसायात पडून सुनीता गायकवाड मागेल दोन वर्षांपासून काम करत आहे. आर्थिक निकड पुरवताना आजवर अनेक संकटे पार करून सुनीताने लहान वयात आपल्या घराची जबाबदारी सांभाळली आहे.

9) अद्वैता मांगले - कबड्डीपटू

शिवछत्रपती पुरस्कारने सन्मानित कबड्डीपटू अद्वैता यांनी आपल्या खेळातील आवड जपताना आपले करिअर घडवले आहे. क्रीडाक्षेत्रात काम, शिक्षण आणि खेळ यांचा मेल घालणाऱ्या अद्वैता एका असामान्य क्रीडाप्रेमी आहेत हे निश्चित.

Navshakticha Jagar (Photo Credits: File Image)

अशा या महिलांचा प्रवास पाहण्यासाठी Latestly Marathi Youtube Page ला नक्की भेट द्या.