Rashtriya Ekata Diwas Wishes: स्वतंत्र भारताचे पहिले उप पंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 144 वी जयंती (Sardar Vallabhbhai Patel Jayanti) आहे. दरम्यान भारतामध्ये त्यांच्या जयंती निमित्त 31 ऑक्टोबर हा दिवस नॅशनल युनिटी डे (National Unity Day) म्हणून साजरा केला जातो. भारताला एकसंध राष्ट्र म्हणून बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा मोलाचा वाटा आहे. वल्लभभाई पटेलांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 दिवशी गुजरात मध्ये नाडियाद येथे झाला. त्यांनी भारताच्या स्वतंत्र्यलढ्यात देखील सहभाग घेतला होता. 565 संस्थानं खालसा करून त्यांना भारतामध्ये समाविष्ट करून घेण्याचं मोलाचं काम केले आहे. त्यांच्या या अतुलनीय कामगिरी मुळेच त्यांना लोह पुरूष अर्थात Iron Man ही उपाधी देण्यात आली. National Unity Day 2020: सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पीएम मोदी आणि अमित शहा यांच्यासह 'या' नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली.
दरम्यान आज सार्या जाती जमाती, धर्म,भाषा, बोली, प्रांत यांचं वैविध्य जपत भारतामध्ये लोकांनी एकत्र नांदावं यासाठी राष्ट्रीय एकता दिवस महत्त्वाचा आहे. मग तुमच्या प्रियजनांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना या विशेष दिवसाच्या निमित्ताने एकजुटीचा संदेश देत तुमच्यामधील भेद मिटवा आणि भारतीय म्हणून एकत्र येण्याचं आवाहन करायला विसरू नका. त्यासाठी आज व्हॉट्सअॅप, फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम वर ही राष्ट्रीय एकता दिवसाच्या शुभेच्छा देणारी Greetings, HD Images, Messages नक्की शेअर करा. सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून का साजरा केला जातो?
राष्ट्रीय एकता दिवस शुभेच्छा
भारत सरकारने 2014 सालपासून 31 ऑक्टोबर हा दिवस वल्लभभाई यांच्या जयंती स्मरणार्थ राष्ट्रीय एकता दिवस मह्णून साजरा करण्यास सुरूवात केली. 2 वर्षांपूर्वीच म्हणजे 31 ऑक्टोबर 2018 ला केवाडिया, गुजरात मध्ये वल्लभभाई पटेल यांचा 'Statue of Unity' उभारण्यात आला आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.