
National Doctor’s Day in India: डॉक्टर ही एक अशी व्यक्ती आहे जी केवळ रूग्णाचा जगणं आणि मरणं यांच्यामधील संघर्ष कमी करण्यासोबत त्यांना एक नवीन आयुष्य देण्यासाठीअविरत मेहनत घेत असते. यंदा कोरोना संकट काळामध्ये जगभरात देवानंतर लोकं कुणाकडे हे जगण्याचं मागणं मागत असतील तर ते केवळ डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा आहे. म्हणूनच कदाचित त्यांना भूतलावरील देवाचं स्थान दिलं जातं. दरम्यान या डॉक्टरांच्या सेवे सन्मार्थ दरवर्षी 1 जुलै दिवशी नॅशनल डॉक्टर्स डे (National Doctor’s Day) साजरा केला जातो. पण या दिवसाच्या सेलिब्रेशन मागे नेमकी प्रेरणा काय आहे? भारतामध्ये 1 मे दिवशीच डॉक्टर्स डे का साजरा केला जातो? अशा अनेक प्रश्नांची उत्तर देण्याचा आमचा हा एक प्रयत्न.
भारतामधील प्रसिद्ध डॉक्टर डॉ बिधान चंद्र रॉय (Dr. B.C. Roy) यांच्या सन्मानार्थ आणि त्यांना श्रद्दांजली म्हणून त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी म्हणजे 1 जुलै दिवशी नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो. त्यांचा जन्म 1 जुअलि 1882 साली बिहारच्या पटना जिल्ह्यामध्ये झाला. कोलकत्ता मध्ये त्यांनी मेडिकल शिक्षण पूर्ण केलं. लंडनमध्ये त्यांनी वैद्यशास्त्रामध्ये उच्च शिक्षण देखील घेतले. 1911 साली भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिक्स सुरू केली.
डॉ बिधान चंद्र रॉय कोण होते?
डॉ बिधान चंद्र रॉय यांचे वैद्यशास्त्रातील कार्य खूप मोठे आहे. भारतामध्ये शिक्षण घेतल्यानंतर लंडनमध्ये सेंट बार्थोलोम्यू हॉस्पिटलमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला.भारतीय असल्याने त्यांना सहजासहजी लंडनमध्ये शिक्षणासाठी प्रवेश मिळणं कठीण झाले होते. दीड महिने पाठपुरावा केल्यानंतर 30 व्यांदा अर्ज केल्यानंतर त्यांना मंजुरी मिळाली. त्यांनी फिजिशियन आणि सर्जन अशी दोन्हींची रॉयल कॉलेजमध्ये सदस्यता मिळवली. त्याकाळी अशी कामगिरी करणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच डॉक्टर होते. भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. डॉक्टर पेशासोबतच ते दूरदर्शी नेतृत्त्व होते. पश्चिम बंगाल राज्याचे ते आर्किटेक्ट समजले जातात. डॉ. बिधान चंद्र रॉय पश्चिम बंगाल चे दूसरे मुख्यमंत्री देखील होते. 1961 साली त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारत रत्न' देण्यात आला होता.
भारतामध्ये नॅशनल डॉक्टर्स डे ची सुरूवात कधी झाली?
भारतामध्ये नॅशनल डॉक्टर्स डे साजरा करण्याची सुरूवात 1991 साली तत्कालीन सरकार कडून झाली. त्यानंतर दरवर्षी 1 जुलै दिवशी नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो. डॉ बिधान चंद्र रॉय यांना आदरांजली अर्पण केली जाते.
भारतामध्ये प्रत्येक वर्षी एका विशिष्ट थीमवर नॅशनल डॉक्टर्स डेचं आयोजन केले जाते.