
Matru Din 2023 Messages: भाद्रपद महिन्यातील अमावस्येच्या दिवशी पिठाची आकृती बनवून दुर्गादेवीसह 64 देवींची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी पूजा, जप आणि तपश्चर्या सोबतच स्नान आणि दान करणे खूप महत्वाचे मानले जाते. पिठोरी अमावस्सेच्या (Pithori Amavasya 2023) दिवशी मातृदिन साजरा करण्याची प्रथा आहे. यंदा 14 सप्टेंबर 2023 रोजी पिठोरी अमावस्या असून या दिवशी मातृदिन साजरा करण्यात येणार आहे.
पिठोरी अमावस्येच्या दिवशी आई आपल्या मुलासाठी व्रत करते. ज्या महिलेला संतती नाही. अशा महिला संतती प्राप्तीसाठी या दिवशी व्रत करतात. त्यामुळे आई आणि मुलांसाठी या दिवशाचे विशेष महत्त्व आहे. मातृदिनानिमित्त तुम्ही Whatsapp Status, Wishes, Greetings, Images, च्या माध्यमातून आपल्या आईला खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Matru Din 2023 Date: मातृदिन कधी आहे? पिठोरी अमावस्येच्या दिवशी का साजरा केला जातो मातृदिन? वाचा सविस्तर)
ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आईची ही वेडी माया
लावी वेड जीवा
जन्मोजन्मी तुझाच मी व्हावा
माझ्या आयुष्यभराचा हाच खरा ठेवा
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

उन्हामधली सावली तूच
पावसातली छत्री तूच
हिवाळ्यातली शाल तूच
माझ्यासाठी आहेस सर्वकाही तूच
मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

प्रेम आंधळ असत हे खर आहे
कारण माझ्या आईने मला न बघताच
माझ्यावर प्रेम करणे सुरू केले होते.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पिठोरी अमावस्येच्या दिवशी हिंदू मान्यतेनुसार पितरांची पूजा करणं अधिक फलदायी ठरतं. भाद्रपद महिन्यातील पिठोरी अमावास्येला मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी पितरांची पूजा केली जाते.