
Matru Din Marathi Wishes: जगभरात मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' (Mothers Day) साजरा केला जातो. मात्र भारतामध्ये श्रावण अमावस्येच्या म्हणजेच 'पिठोरी अमावस्या' (Pithori Amavasya) दिवशी मातृदिन (Matru Din) साजरा केला जातो. हा दिवस यंदा 18 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. वास्तविक असे डेज सेलिब्रेट करणे हे पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानुकरण असल्याचं म्हणत अनेकदा विरोध केला जातो पण पिठोरी अमावस्येला मातृदिन साजरा करण्यामागे एक विचार आहे, पिठोरी अमावस्येदिवशी ज्या मातांची मुलं अल्पायुषी ठरतात किंवा ज्यांना अपत्यप्राती होत नाही अशा महिला व्रत करतात. सामान्यतः बाळाच्या सुदृढ दीर्घायुष्यासाठी माता व्रत करतात म्हणुनच या व्रताचा दिन 'मातृदिन' म्हणून साजरा केला जातो. यंंदा या दिवसाच्या निमित्त तुम्हीही तुमच्या आईला सरप्राईझ देउन शुभेच्छा देउ शकता, यासाठी खाली दिलेल्या मराठी चारोळ्या, Messages, GIFs, तुमच्या Whatsapp Status, Facebook वर शेअर करायला विसरु नका.
मातृदिनाच्या मराठी शुभेच्छा
आई
तुझ्या चेहर्यावरील हसु असंच राहू दे
आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ येऊ दे
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

माझी आई..
माझी मैत्रिण..
मातृदिनाच्या शुभेच्छा!

ठेच लागता माझ्या पायी..
वेदना होते तिच्या हृदयी..
33 कोटी देवांमध्ये श्रेष्ठ माझी 'आई'
मातृदिनाच्या खुप खुप शुभेच्छा!

नातंं मायेचं
छत्र छायेचं
आई
तुला मातृदिनाच्या मनापासुन शुभेच्छा

देवा जिने जन्म देउन घडविलं मला
सदैव सुखी ठेव माझ्या आईला
मातृदिनाच्या खुप शुभेच्छा

मातृदिन विशेष GIFs
दरम्यान, आपल्या अस्तित्वाचंं कारण असणार्या आईला आपण गिफ्ट देउन तिच्या ऋणातुन उतराई होउ शकणार नाही मात्र तिला एका दिवसासाठी खुश मात्र नक्कीच करु शकतो. यंंदा लॉकडाउन मुळे बाहेर जाउन गिफ्ट वैगरे आणण्याचं जरा कठीणच आहे मात्र त्याऐवजी एखादं पत्र लिहुन, आईच्या आवडीची एखादी डिश करुन तिला सरप्राईझ देऊ शकता. तुमचा प्लॅन काय आणि कसा होतोय हे आम्हाला नक्की कळवा.