Margashirsha Guruvar Vrat 2022 Messages: मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवार निमित्त WhatsApp Status, Facebook Post, Images शेअर करत द्या मंगलमय शुभेच्छा

मराठी महिन्यातील (Marathi Month) नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना (Margashish Month). या महिन्यात  लक्ष्मी मातेच्या पूजेला विशेष महत्व आहे. किंबहुना मार्गशीष महिन्याच्या दर गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजेस धार्मिक महत्व आहे. उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होईल आणि योगायोगाने उद्या म्हणजेचं 24 नोव्हेंबरला (November) मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सवाष्ण महिला मनोभावे महालक्ष्मी व्रत करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं.  हे व्रत केल्यास घरात सुख समृध्दी नांदते. यंदा 2022 मध्ये मार्गशीर्ष महिना 2३ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे आणि योगायोग म्हणजे हा दिवस गुरुवार असल्यामुळे या महिन्याचा पहिला गुरुवार हा 24 नोव्हेंबरला आहे तर या दिवशी व्रत सुरु करावे. तरी या मंगलमयी महिन्यात तुम्हाला तुमच्या प्रियजनांना मार्गशीर्ष महिन्याच्या मंगलमय शुभेच्छा द्यायच्या असल्यास आम्ही तुमच्यासाठी डिजीटल मेसेजेस (Messages) घेवून आले आहोत. Margashirsha Guruvar 2022 Wishes In Marathi: मार्गशीर्ष मासारंभ आणि

गुरूवार व्रताच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे Messages, WhatsApp Status!

मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरूवार व्रताच्या शुभेच्छा

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा
नेहमी आपणास लक्ष्मी प्राप्त होवो!
लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो!
घरची लक्ष्मी प्रसन्ना तर सारे घर प्रसन्न !
मार्गशीर्ष  महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा!

 

 

समृध्दी यावी सोनपावली
उधळणं व्हावी सौख्याची
वर्षा व्हावी हर्षाची
शुभेच्छा ही मार्गशीष गुरुवार  व्रताची !

 

सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा प्रत्येक दिवस असावा
येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि भरभराटीचा असावा
मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा
शुभ प्रथम मार्गशीर्ष लक्ष्मी पूजन!

सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते  मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!

मार्गशीर्ष गुरुवार -मार्ग - मार्ग नेहमी असा असावा की जिथे  शीर्ष - शीर्ष नम्रतेने सदा झुकलेले असावे
गुरु - गुरू असा असावा की ज्याच्या कडून वार - वारंवार योग्य मार्गदर्शन लाभावे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरूवारच्या हार्दिक शुभेच्छा!