Margashirsha Guruvar Vrat 2022 Dates: हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना पवित्र महिन्यापैकी एक मानला जातो. दिवाळी सणानंतर मार्गशीर्षमार्गशी महिना सुरु होतो. यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात 24 नोव्हेंबर 2022 पासून होणार आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरूवारी महालक्ष्मी मातेचे व्रत करण्याची पद्धत आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात गुरुवारपासून होत आहे. मार्गशीर्षनिमित्त घरात घटांची स्थापना केली जाते आणि मनोभावे पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला जातो. दरम्यान मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या तारखेला गुरुवार येत आहे त्याची यादी आम्ही घेऊन आलो आहोत, पाहा
मार्गशीर्ष महिना गुरूवार 2022 व्रत तारखा माहिती मराठी
- पहिला गुरूवार - 24 नोव्हेंबर
- दुसरा गुरूवार - 1 डिसेंबर
- तिसरा गुरूवार - 8 डिसेंबर
- चौथा गुरूवार - 15 डिसेंबर
- पाचवा गुरूवार - 22 डिसेंबर
22 डिसेंबरच्या रात्री अमावस्या 7 वाजून 14 मिनिटांनी सुरू होणार असून समाप्ती 23 डिसेंबर दिवशी दुपारी 3 वाजून 47 मिनिटांची आहे.