Margashirsha Guruvar Vrat 2023 Messages: हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यात (Month of Margashirsha) येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत (Margashirsha Guruvar Vrat 2023) पाळले जाते. यावर्षी मार्गशीर्ष महिना अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार 13 डिसेंबरपासून सुरू होत आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार 14 डिसेंबरला असणार आहे. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते. पहिल्या गुरुवारनंतर 21 डिसेंबरला दुसरा गुरुवार तर 28 डिसेंबरला तिसरा गुरुवार असेल. याशिवाय 4 जानेवारीला चौथा गुरुवार असणार आहे.
माता लक्ष्मीची कृपादृष्टी सर्वांवर राहावी यासाठी लोक एकमेकांना पहिल्या गुरुवारच्या शुभेच्छा देतात. तुम्हालादेखील मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवार निमित्त WhatsApp Status, Images, Wallpapers शेअर करत आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करून पाठवू शकता. (हेही वाचा - Margashirsha Mahalaxmi Guruvar Vrat 2023 Dates: 13 डिसेंबर ते 11 जानेवारी मार्गशीर्ष महिना; पहा महालक्ष्मी व्रत कोणते 4 दिवस!)
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा
नेहमी आपणास लक्ष्मी प्राप्त होवो!
लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो!
घरची लक्ष्मी प्रसन्ना तर सारे घर प्रसन्न !
मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा!
समृध्दी यावी सोनपावली
उधळणं व्हावी सौख्याची
वर्षा व्हावी हर्षाची
शुभेच्छा ही मार्गशीष गुरुवार व्रताची !
मार्ग- मार्ग नेहमी असा असावा की जिथे
शीर्ष- शीर्ष नम्रतेने सदा झुकलेले असावे
गुरू- गुरू असा असावा की ज्याच्या कडून
वार- वारंवार योग्य मार्गदर्शन लाभावे.
मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरूवारच्या हार्दिक शुभेच्छा !
ॐ महालक्ष्मी नमः ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः ।
मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!
सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा प्रत्येक दिवस असावा
येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि भरभराटीचा असावा
मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते ।
मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!
धार्मिक ग्रंथांनुसार मार्गशीर्ष महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. विवाहित महिला तसेच अविवाहित मुली हे व्रत मोठ्या भक्तीभावाने करतात. तुम्ही वरील मेसेज पाठवून तुमच्या आप्तस्वकियांना या दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा पाठवू शकता.