Marathwada Mukti Sangram Din HD Images: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages च्या माध्यमातून देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं!
Marathwada Mukti Sangram Din । File Photo

महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन (Marathwada Mukti Sangram Din)  म्हणून साजरा केला जातो. यंदा देखील कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हर्च्युअल माध्यामातून मराठवाडा मध्ये मुक्ती स्तंभावर या लढ्यात प्राणाची आहुती देणार्‍यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला असला तरीही निजामाच्या ताब्यात असलेल्या हैदराबाद संस्थानामध्ये महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांचा समावेश होता. आणि त्यांच्यासाठी आजचा दिवस भारताच्या स्वातंत्र्यदिना इतकाच महत्त्वाचा आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 13 महिने संघर्ष करून, निजामाच्या जुलमी अत्याचाराविरूद्ध आवाज उठवत मराठवाड्यातील जनतेने स्वातंत्र्य मिळवले आहे. मग आज या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा (Marathwada Liberation Day) तुमच्या मराठवाड्यातील मित्रमंडळींना, नातेवाईकांना खास शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्स (Greetings), एसएमएस (SMS), मेसेजेस (Messages) यांच्यामाध्यमातून शेअर करून आनंद द्विगुणित करायला विसरू नका. Marathwada Mukti Sangram Din: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कधी असतो? भारताच्या स्वातंत्र्यानंतरही मराठवाडा मधील जनतेला 13 महिने का करावा लागला संघर्ष!

मराठवाडा मुक्ती संग्रामाचं नेतृत्त्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलं होतं. त्यांच्यासोबत अनेकांनी भारतामध्ये समाविष्ट होण्यासाठी आपला लढा तीव्र केला. काहींनी त्यासाठी आपल्या जीवाची बाजी देखील लावली आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा

Marathwada Mukti Sangram Din । File Photo
Marathwada Mukti Sangram Din । File Photo
Marathwada Mukti Sangram Din । File Photo
Marathwada Mukti Sangram Din । File Photo

भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 दिवशी लष्करी फौजा निजामाच्या संस्थानामध्ये घुसवल्या. या कारवाईला पोलिस अ‍ॅक्शन असेही म्हणतात. अखेर 17 सप्टेंबरला निजाम भारत सरकारला शरण आला आणि हैदराबाद संस्थान भारतामध्ये समविष्ट झाले. यामधील महाराष्ट्राच्या मराठवाड्यानेही स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला. 15 ऑगस्ट प्रमाणे या दिवशी मराठवड्यातील जनता त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचं, भारतामध्ये समाविष्ट झाल्याचा आनंदाचं सेलिब्रेशन उत्साहाने करतात.