27 फेब्रुवारी हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा दिवस असतो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज (Kusumagraj) यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी राजभाषा गौरव दिवस (Marathi Rajbhasha Gaurav Diwas) किंवा मराठी भाषा दिवस (Marathi Bhasha Diwas) म्हणून साजरा केला जातो. 'माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।' असं वर्णन संत ज्ञानेश्वरांनी (Sant Dyaneshwar) ज्या भाषेचं केले आहे त्या भाषेचं गुणगाण या निमित्ताने गायलं जातं. त्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केले जाते. यंदा तुमच्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांनाही या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे मेसेजेस, संदेश, शुभेच्छापत्र, HD Images, Greetings, WhatsApp Status शेअर करायची असतील तर लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेले हे फोटोज डाऊनलोड करून तुम्ही नक्कीच शेअर करू शकता.
मराठी भाषेचे इतिहास आणि व्याप्ती पाहता आता या भारतीय भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सरकार दरबारी प्रयत्न सुरू आहेत. हे देखील नक्की वाचा: Marathi Rajbhasha Din 2022: किल्ला ते कागद मराठी मधील हे शब्द Persian भाषेतही अर्थासह शब्द सारखेच वापरले जातात!
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
मराठी भाषा दिनानिमित्त करू मराठी भाषेचा सन्मान
राखू मराठीचा अभिमान आणि करू मराठीचा जयजयकार
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!
आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर
प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अभिमान मराठी असल्याचा
गौरव मराठी भाषेचा
मराठी राजभाषा दिन साजरा करून
मान राखूया मराठी भाषेचा
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
प्रत्येक मराठी बांधवाला मराठी राजभाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कुसुमाग्रज यांना 1987 साली साहित्य विश्वातील मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारकडून कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्याला सुरूवात झाली. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील 10 वी तर भारत देशातील 3 री भाषा आहे.