27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस (Marathi Rajbhasha Din) म्हणून साजरा केला जातो. मराठी कवी कुसुमाग्रज (Kusumagraj) अर्थात वि वा शिरवाडकर यांजा जन्मदिवस देखील 27 फेब्रुवारी आहे. ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रम यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत दरवर्षी 27 फेव्रुवारीला मराठी भाषेचं गुणगाण गाणार्या कार्यक्रमांचं आयोजन केले जाते. सध्या मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून देखील विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.
मराठी भाषा, हिंदी भाषेवर पर्शियन भाषेचा पगडा आहे. त्याच कारणही सोप्प आहे. भारतीय भाषांची मुळं संस्कृत किंवा देवनागरीत आढळतात त्याचप्रमाणे पर्शियन भाषेची मुळे Avasthan मध्ये आहेत. संस्कृत ही इंडो युरोपियन भाषा कुटुंबातील प्राचीन भाषांपैकी एक आहे आणि तशीच जुनी इराणी (किंवा जुनी पर्शियन) आहे. ‘Stan’(पर्शियन) आणि ‘sthan’(संस्कृत), हे दोन वेगवेगळे शब्द वाटत असले तरीही त्यांच्या भाषेमध्ये अर्थ सारखाच आहे तो म्हणजे ठिकाण किंवा जमीन. नक्की वाचा: मराठी भाषेचं सौंदर्य अधिक खुलवतात महाराष्ट्रातील या '14' मजेशीर बोली भाषा.
पर्शियन आणि मराठीतील असेच सारखे शब्द
हजार - 1000
कागद - Paper
किल्ला - Fort
आस्मान - आभाळ/ Sky
जहाज - Ship
फक्त - Only
साल - वर्ष/Year
खूर्ची- Chair
अनेक इस्लामिक शासकांनी भारतीय उपखंडावर राज्य केले आणि पर्शियन अर्थात फारसी ही त्यांच्या न्यायालयाची भाषा होती त्यामुळे आपल्या भारतीय भाषेच्या बोलीचालीवर देखील त्याचा परिणाम दिसून येत आहे.