Marathi Rajbhasha Diwas: 'लाभले आम्हास बोलतो मराठी' या सुरेश भटांंच्या पंक्तितूनच एखाद्या मराठी माणसाच्या अंगावर काटा येईल अशी स्थिती होते. म्हणून आज (27 फेब्रुवारी) 'मराठी भाषा दिन' हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज हे श्रेष्ठ मराठी कवी नाटककार व कादंबरीकाराने नावाजलेले होते. तसेच त्यांची दुसरा पेशवा, वीज म्हणाली किंवा नटसम्राट यांसारखी नाटके आणि जीवनलहरी, किनारा वादळवेल यांसारखे काव्यसंग्रह गाजले व त्यांना त्याकरता पुरस्कारही दिले गेले.
मराठी भाषा दिन आपण कुसुमाग्रजांचा आदर आपल्या समोर ठेवून साजरा तर करतोच.पण असे जगातील किती लोक आहेत त्यांना मराठी भाषेचा अभिमान वाटतो.प्रत्येक जण आपल्या मातृभाषेचा कशा प्रकारे उपयोग करतो ही सळ्यात महत्तवाची बाब आहे.असे म्हटले जाते कि जेव्हा कधी तुम्हीला दुसऱ्या भाषेतच्या संभाषणात अडथळे येतात तेव्हा तुम्हाला तुमची मातृभाषा आठवते. ज्या रयतेच्या राजाने हिंदवी स्वराज्य प्रस्थापित केले त्याचा वारसा कायपणे कसा पुढे चालू राहिल या दृष्टिने विचार करायला हवा. तर मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने 'या' खास HD Greetings, Wishes, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!(Marathi Rajbhasha Din 2020: मराठी राजभाषा दिन कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त का साजरा केला जातो?)
मराठी ही एक समृद्ध भाषा आहे. 'अमृतासही पैजा जिंके' अशा शब्दांत ज्ञानेश्वरांनी या भाषेचं कौतुक केलं होतं. जसा काळ बदलतो तसे भाषेमध्येही बदल होतात. बोली भाषादेखील तितक्याच समृद्ध आहेत. त्याची लाज वाटण्यासारखं काहीच नाही. उलट बोली भाषेमुळे आपण विशिष्ट प्रांतांची ओळख मोठी करतोय असं त्याच्याकडे पाहून त्याचा संवर्धन करणं आवश्यक आहे.