Mangalagaur 2021 (Photo Credits: Instagram)

Mangalagaur 2021: आजपासून श्रावण महिन्याला आरंभ झाला. उद्या (10 ऑगस्ट) श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार. म्हणजे मंगळागौरीच्या पूजनाचा दिवस. आजपासून श्रावण महिन्याला आरंभ झाला. उद्या श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार. म्हणजे मंगळागौरीच्या पूजनाचा दिवस. नवविवाहितांसाठी हे व्रत अत्यंत खास असते. लग्नानंतर पहिली पाच वर्षे हे व्रत केले जाते. अखंड सौभाग्य व तिच्या सासर-माहेरास सुखसमृद्धी लाभावी म्हणून हे व्रत करतात. या दिवशी मंगळागौर पूजनानंतर झिम्मा, फुगडी यांसारखे महिलांचे विशेष कार्यक्रम रंगतात. (Mangalagaur 2021: मंगळागौर पूजन कसे कराल? जाणून घ्या विधी आणि महत्त्व)

खेळ खेळत रात्र जागवली जाते. यावेळी नाव घेण्याचा आग्रह नक्कीच केला जातो आणि तो टाळताही येत नाही. अशावेळी हे उखाणे नक्कीच तुमची मदत करतील आणि मंगळगौरीच्या कार्यक्रमात विशेष रंगत आणतील. (Mangalagauri Vrat 2021 Dates: मंगळागौर पूजा यंदा कधी? जाणून घ्या तारखा आणि पूजा विधी)

मंगळागौर उखाणे:

1. सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,

... चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी

2. मंगळागौरी आशिर्वाद दे..येऊ दे भाग्या भरती,

….च्या उत्कर्षाची कमान राहू दे चढती..!

3. सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे,

….. रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे

4. मंगळागौरीच्या खेळामुळे मिळाली

गोड आठवण,

... रावांचे नाव घेते,

सासरी लाभली मला,

प्रेमाची साठवण

5. मंगळागौरी पुढे लावली

समईची जोडी,

... रावांच्या सहवासाने

आली माझ्या जीवनात गोडी

यंदा मंगळागौर पूजनासाठी एकूण 4 दिवस मिळत आहेत. मागील वर्षीपासून सणांवर कोरोनाचे सावट आहे. यंदाही ते कायम असल्याने नियमांचे पालन करुन मंगळागौरीच्या पूजन आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या.