Makaravilakku 2020: मकर संक्रांतीच्या निमित्ताने केरळ येथील साबरीमाला मंदिरात मकरविलक्कु, मकर ज्योत या वार्षिक उत्सवाची तयारी
Sabarimala Temple (Photo Credits: ANI)

मकर संक्रातीच्या (Makar Sankranti 2020) निमित्ताने केरळ येथील साबरीमाला मंदिरात (Sabarimala Temple) मकरविलक्कु (Makaravilakku 2020) हा वार्षिक उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. येत्या 15 जानेवारी 2020 रोजी हा सण साजरा केला जाईल. तसेच या उत्सवात मकर ज्योतीला (Makar Jyothi) अधिक महत्व दिले जाते. मकर संक्रातीच्या 41 दिवस अगोदर पुरुष वर्ग उपवास ठेवतात आणि शेवटच्या दिवशी साबरीमाला मंदिराला भेट देतात. तसेच या दिवशी पूर्ण मंदिरात दिव्यांचा लखलखाट देखील पाहायला मिळतो. कित्येक वर्षापासून मकरविलक्कु हा उत्सव साजरा केला जातो. दरम्यान, देश-परदेशातून पर्यटक या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी साबरीमाला मंदिरात आवर्जून येत असतात. दरवर्षी भगवान आयप्पाचे दर्शन घेण्यासाठी जवळपास 5 लाखापर्यंत भाविक येतात.

मकरविलक्कु 2020 कधी आहे?

मकरविलक्कु 2020 हा सण येत्या 15 जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. संक्रांती मुहूर्त 2 वाजून 22 मिनिटांनी तर, मकर ज्योत पूजा संध्याकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी सुरू होणार आहे. साबरीमाला मंदिराला भेट न देऊ शकणारे भाविकांना थेट टिव्हीच्या माध्यमातून आयप्पाचे दर्शन घेता येणार आहे.

मकर ज्योत कशी साजरी केली जाते?

मकर ज्योत अलग-अलग लोक विविध पद्धतीने साजरी करतात. काही भाविक या दिवशी आपले 41 दिवसांचा उपवास समाप्त करतात. दरम्यान काळे कपडे परिधान करतात. तसेच शारीरिक संबध, व्यसन, अन्य इतर गोष्टींपासून दूर राहतात. भाविक मकर ज्योतीसाठी मंदिरात पोहचतात आणि पारंपारिक पद्धतीने आरतीत सहभागी होतात. हे देखील वाचा-Makar Sankranti 2020: यंदा मकर संक्रांती ला चुकूनही घालू नका 'या' रंगाचे कपडे जे देतील अशुभाचे संकेत

मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे फार महत्व आहे. या दिवशी जी माणसे दान देतात त्या व्यक्तींवर सूर्यदेवाची कृपा बनून राहते, असे मानले जाते. त्यामुळे यंदा दान करून, आपल्या परिवारासोबत पतंग उडवून, तिळगुळाचे पदार्थ खाऊन हा सण आनंदाने साजरा करा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांति सणाच्या खूप खूप शुभेच्छा!