
Makar Sankranti 2022 HD Images: संक्रमण किंवा मार्गक्रमण याला संक्रांत असे म्हणतात. सूर्य मकर राशीतून मार्गक्रमण करतो म्हणून मकर संक्रांत असे म्हटले जाते. शिवाय या दिवसापासून थंडीच्या काळात लहान वाटणारा दिवस हळू हळू मोठा होवू लागतो. नवीन काही खरेदी केल किंवा मिळाल तर आपण देवासमोर ठेवतो. त्यामुळे या काळात शेतात येणारे वाल, पावटा, गाजर, बोर, गव्हाच्या लोंबी देवाला अर्पण केले जातात. यामागे आपुलकीची , आदराची भावना असते. म्हणूनच संक्रांतीच्या आदल्यादिवशी सर्व भाज्या एकत्रित करून भाजी केली जाते. तसेच तीळ लावून भाकरी केली जाते.
संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या वड्या, तिळगुळ एकमेकांना दिल जात. थंडीच्या दिवसात शरीरात उष्णता राहावी हा त्यामागचा उद्देश. तर यंदाच्या मकर संक्रातीनिमित्त मराठमोठ्या शुभेच्छा, Messages, Wallpapers, Facebook Post, WhatsApp Status च्या माध्यमातून साजरा करा सण.






रोजच्या धावपळीच्या काळात एकमेकांना भेटणे शक्य नसते. स्त्रियांना रोजच्या कामातून थोडासा निवांतपणा मिळावा त्यामुळे स्त्रिया मंदिरात जावून पांडुरंगाला ओवसतात म्हणजेच वाल, पावटा, गाजर, बोर, गव्हाच्या लोंबी देवाला अर्पण करतात. निदान सणासुदीला भेटी होतात. त्यामुळे याला सणाचे महत्व प्राप्त झाले आहे. वैर भाव विसरून सर्वांनी गोडीने राहावे असा एक संदेश देणारा हा सण आहे.
या सणाला काळे कपडे घातले जातात विशेष करून स्त्रिया काळ्या साड्या घालतात. काळा रंग उष्णता शोषून घेतो थंडीत उष्णतेची गरज असते. लहान मुलांना बोर न्हान केल जात. अशा अनेक गोष्टीमुळे या सणाला महत्व आहे.