Makar Sankranti 2020 (PC - File Photo)

मकर संक्रांतीचा शुभ दिवस दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या वर्षी म्हणजे 2020 मध्ये 15 जानेवारीला हा सण साजरा होणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा हा सण प्रत्येकाच्याच आयुष्यात आनंद पसरवतो. ज्योतिषी म्हणतात की जेव्हा सूर्य देव मकर राशीत येतो तेव्हा सूर्य शनीच्या प्रिय वस्तूंचे दान केल्यास भक्तांना आशीर्वाद देतो. हिंदूंच्या श्रद्धेनुसार तीळ शनिदेवाला प्रिय आहेत. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान केले किंवा सेवन केले तर शनिदेव त्यास प्रसन्न होतात.  याच कारणामुळे, मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान केल्यास कुटुंबात शनिदेवची विशेष कृपा होते. या दिवशी स्नान, दान करणे, गंगा नदीत पूजा केल्यास शंभर पट फळ मिळते.

तुमच्या राशीनुसार दान करा

मेष - तीळ आणि गूळ दान करा, तुम्हाला उच्च दर्जा मिळेल.

वृषभ- सूर्याला तीळ वाहिल्यास, तुम्हाला मोठी जबाबदारी मिळेल.

मिथुन- तीळ, दुर्वा आणि फुले पाण्यात मिसळा आणि सूर्याला वाहा, तुम्हाला यश मिळेल.

कर्क- तांदूळ-साखर-तीळ दान करा, भांडण-संघर्ष, व्यत्यय थांबतील.

सिंह - तीळ, गूळ, गहू, सोने दान करा म्हणजे नवीन यश मिळेल.

कन्या - सूर्याला फुले वाहा.

तूळ - पांढरे चंदन, दूध, तांदूळ दान करा.

वृश्चिक- पाण्यात कुंकू आणि गुळाचे दान द्या, परदेशी कामांचा फायदा होईल, परदेश प्रवास होईल.

धनु: हळद, केशर, पिवळी फुले पाण्यात मिसळा आणि सूर्याला अर्पण करा, सर्वत्र विजय होईल.

Makar Sankranti 2020 Messages: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा उत्तरायणाचा सण!

मकर - तीळ सूर्याला अर्पण करा, तुम्हाला अधिकार प्राप्ती होईल.

कुंभ - तेल आणि तीळ दान करा, विरोधकांचा पराभव होईल.

मीन- हळद, केशर, पिवळी फुले, तीळ, मोहरी, केशर मिसळून सूर्याला अर्पण करा, आदर आणि कीर्ति मिळेल.