
Mahavir Jayanti 2020 Marathi Wishes: जैन संप्रदयातील एक महत्वाचा सण म्हणजे महावीर जयंती (Mahavir Jaynati). जैन धर्माचे 24 वे तीर्थांकार महावीर स्वामी (Mahavir Swami) यांचा जन्म दिवस म्हणजेच महावीर जयंती यंदा 6 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. भगवान महावीरांनी संपूर्ण समाजाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला होता. दरवर्षी यानिमित्ताने अनेक जैन बांधव भजन संध्येसारख्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करतात मात्र यंदा सर्व सणांवर कोरोना (Coronavirus) नामक संकटाचे सावट असल्याने मोठा उत्सव साजरे करणे तरी शक्य होणार नाही, मात्र त्यामुळे सणांची किंबहुना या खास दिवसाचे महत्व काही कमी होत नाही. तुमच्या ओळखीतील जैन बांधवाना या खास दिवसाच्या शुभेच्छा खास मराठीतून देता याव्यात यासाठी काही खास शुभेच्छापत्र तयार करण्यात आली आहेत, महावीर जयंतीच्या शुभेच्छा देणारे हे मराठी Messages, Greetings, Images तुम्ही Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून आपल्या जवळच्या व्यक्तींशी शेअर करू शकता. Mahavir Jayanti 2020: महावीर जयंती का साजरी केली जाते?
महावीर जयंती च्या शुभेच्छा
अहिंसेचा मार्ग दाखवून
जगाला प्रेमाची शिकवण देणारे
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर
महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन

अहिंसा परमो धर्मः
धर्म हिंसा तथैव च: l
महावीर जयंती निमित्त
जैन बांधवाना खूप खूप शुभेच्छा

जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांच्या स्मृतीस आज जयंती निमित्त अभिवादन

अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री ची शिकवण देणाऱ्या
महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
त्रिवार अभिवादन

जैन धर्माचे 24 वे तीर्थांकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
जैन बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा

जैन संप्रदयामध्ये महावीर जयंतीचा उत्सव अगदी आनंदात साजरा केला जातो. भगवान महावीर यांनी नेहमी समाजाला प्रेम, अहिंसेचा मार्ग दाखवला. निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी त्यांनी समाजाला प्रोत्साहित केले. आपल्याला सुद्धा चिंतामुक्त जीवन जगायचे झाल्यास महावीरांच्या या विचारणा आचरणात आणून पाहावे, वास्तविक हेच खऱ्या अर्थाने त्यांनी अभिवादन ठरेल.