
Mahatma Phule jayanti Images 2021: आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. ज्योतिराव गोविंदराव फुले हे भारतातील महान विचारवंत, समाजसेवक लेखकासह शिक्षणसम्राट होते. त्यांचे विचार आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म आजच्या दिवशी 1827 मध्ये झाला होता. त्यांनी महिलांना शिक्षण देण्यासाठी बहुमोलाचा वाटा आपल्या पत्नीसह उचलला होता. तर समाजाने आपल्यावर चिखल फेकले, दगड फेकले तरीही त्यांनी आणि सावत्रिबाई फुले यांनी महिलांना शिक्षण देण्याचा ध्यास कधीच सोडला नाही.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातीभेद, लिंगभेद, उच्च नीच विरूद्ध मोठी लढाई लढविली. एवढेच नव्हे तर न्याय आणि समानतेच्या मूल्यांवर आधारित समाजाची दृष्टी त्यांनी मांडली. ते महिलांच्या शिक्षणाचे प्रबळ वकील होते. तर यंदा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून करा विनम्र अभिवादन!(Jyotiba Phule Jayanti 2021 Quotes: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्याचे खास प्रेरणादायी विचार)



महात्मा जोतिबा फुले हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते. डॉ. आंबेडकर हे जोतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे.सावरकर त्यांना ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणत. दलितांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढण्याच्या आपल्या हेतूच्या सिद्धीसाठी त्यांना घर सोडावे लागले. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड, इशारा, सत्सार अंक १ आणि २, सार्वजनिक सत्यधर्म ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.