आज एकदंत संकष्टी चतुर्थी असून या दिवशी उपवास धरला जातो. तसेच प्रत्येक महिल्या संकष्टी चतुर्थी येत असून त्याबाबत व्रत ठेवले जाते. परंतु जेष्ठ महिन्यात येणाऱ्या संकष्टीचे विशेष महत्व आहे. याच कारणास्तव आज संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधत पंढपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी (Shri. Vitthal Rukmini) मातेच्या गाभाऱ्यास 3100 रत्नागिरी आंब्यांनी आणि आंब्यांच्या पानांनी आरास केली आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यास मनमोहक असे आमराईचे स्वरुप आले आहे. त्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणीचे आंब्याच्या गाभाऱ्यातील रुप अधिक खुलून येत आहे.
राज्यावर कोरोनाचे सावट पाहता सर्व मंदिर स्थळ बंद ठेवण्यात आली आहे. तसेच भाविकांना सुद्धा मंदिरात प्रवेश दिला जात नाही आहे. परंतु मंदिरांतील पुजाऱ्यांकडून देवतांची पुजा नेहमी प्रमाणे केली जात आहे. तर पंढपूर मधील श्री विठ्ठलाचे गाभारा, चौखांबी आदी ठिकाणी आंब्याची आरास करण्यात आल्याने श्री विठ्ठल आमराईत उभा असल्याचा भास होत असून देवाचे हे लोभस रुप आज अधिकच मनाला मोहणारे ठरणारे आहे.(Sankashti Chaturthi May 2020: संकष्टी चतुर्थी निमित्त कशी कराल गणरायाची पूजा? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि पूजा विधी)
यापू्र्वी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चैत्र गुढीपाढवा निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला आणि मंदिरात चाफांच्या फुलांची आरास करण्यात आली होती. तसेच कोरोनाचे महासंकट राज्यावर आल्याने दूर करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मातेकडे प्रार्थना करण्यात आली आहे.