
Maharashtra Din Wishes in Marathi: महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) म्हटला की महाराष्ट्राचा नागरिक असलेल्या प्रत्येकामध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Workers Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्वांना सार्वजनिक सुट्टी असते. हा मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. मात्र यंदा याच महाराष्ट्रावर कोरोनाचे सावट असल्याकारणाने आपल्या एकत्रितरित्या येऊन हा दिन साजरा करता येणार नाही. मात्र आपण सोशल मिडियाद्वारे आपल्या मित्रपरिवाला, आपल्या जवळच्या व्यक्तींना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो.
महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला खास मराठीतून शुभेच्छा संदेश हवे असतील. म्हणूनच तुमच्यासाठी खास मराठीतून शुभेच्छा संदेश:
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
थोर शूरवीरांच्या इतिहासाने भरलेला पावन देश हा
संस्कृती-परंपरा जपणारा पवित्र देश हा
सण-उत्सव एकत्र येऊ साजरा करणारा महान देश हा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा
ज्याच्या संस्कृती, परंपरेचा जगभरात आहे गाझा-वाझा
असा महान, पवित्र आहे महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

महाराष्ट्राची यशोगाथा
महाराष्ट्राची शौर्यकथा
पवित्र माती लावू कपाळी
धरणी मातेच्या चरणी माथां
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची… पर्वा बी कुनाची
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

आज शुभेच्छा संदेशांनी तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येकाला कोरोनाशी लढण्याचे बळ नक्की द्याल. मात्र त्याचबरोबर प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. आपल्या कुटूंबासाठी अशा बिकट परिस्थितीत घराबाहेर पडलेल्या कामगारांनी देखील आपली काळजी घ्या. काळ थोडा कठीण आहे मात्र हेही दिवस जातील आणि सुखाचे आणि आनंदाचे दिवस परत येईल हा विश्वास प्रत्येकाच्या मनात कायम असावा हीच इच्छा. जय महाराष्ट्र!