Happy Maharashtra Day Messages in Marathi: महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून 'महाराष्ट्र दिन' साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. त्यामुळे दरवर्षी 1 मे हा दिवस 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रीया सुरु असताना राज्य पुनर्रचना आयोनाने मुंबई महाराष्ट्रास देण्यास नकार दिला. त्यामुळे मराठी माणसापासून मुंबई तोडली जाण्याची चीड सहन न झाल्याने 21 नोव्हेंबर 1956 रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा भव्य मोर्चा फ्लोरा फाऊंटन समोरील चौकात जमला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊ लागला. हा मोर्चा पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, मात्र मोर्चा पागत नसल्याचे लक्षात येताच तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले. या गोळीबारात 106 आंदोलकांना हौतात्म आलं. या बलिदानामुळे अखेर सरकारने 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. या हुतात्मांच्या बलिदानार्थ 1965 साली हुतात्मा स्मारकाची स्थापना करण्यात आली.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Wishes, Quotes आणि Banner तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करुन हा गौरवदिन साजरा करु शकता.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
मंगल देशा...
पवित्र देशा...
महाराष्ट्र देशा...
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरणी मातेच्या चरणी माथा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
विसरु नका हुतात्मांचे कष्ट
अखंड राखू अपुला महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दगड झालो तर "सह्याद्रीचा" होईन!
माती झालो तर "महाराष्ट्राची" होईन!
तलवार झालो तर "भवानी मातेची" होईन!
आणि…
पुन्हा मानव जन्ममिळाला तर "मराठीच" होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा..
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कोरोना व्हायरस संकटामुळे यंदाही महाराष्ट्र दिन अगदी साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. त्यामुळे नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करुया आणि डिजिटल माध्यमातून शुभेच्छा देऊन महाराष्ट्र दिन साजरा करुया.