
महाराष्ट्र दिनाची स्थापना 1 मे 1960दिवशी करण्यात आली. मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी मराठी जनतेने मोठा लढा पुकारला आणि अखेर सरकारने नमते घेत मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती केली. 107 हुतात्म्यांच्या स्मरण करत 1 मे दिवशी महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) जल्लोषात साजरा केला जातो. मग यंदा या दिवसाचा आनंद मराठमोळे मेसेजेस, WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Greetings शेअर करत या महाराष्ट्र दिनाचा आनंद द्विगुणित करा.
महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राज्याच्या वैभवसंपन्न इतिहासाच्या कथा नव्या पिढीला सांगितल्या जातात. भारतीय संसदेने 25 एप्रिल 1960 रोजी लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायदा, 1960 नुसार या चळवळीचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. नक्की वाचा: महाराष्ट्र दिनानिमित्त काढता येतील अशा आकर्षक आणि सुंदर रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा





भाषिक राज्य पुनर्रचनेनुसार महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 रोजी मराठी भाषिक राज्य म्हणून अस्तित्वात आले. काँग्रेस पक्षाचे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. राज्य पुनर्गठन अधिनियम, 1956 ने भाषेच्या आधारावर भारतातील राज्यांसाठी असलेल्या सीमा निश्चित केल्या. परंतु 1956 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंनी 5 वर्षांसाठी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. नंतर लोकसभेने द्विभाषिक बॉम्बे (मुंबई) राज्याचा ठराव मंजूर केला. मार्च 1960 मध्ये लोकसभेने राज्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर एका महिन्यानंतर कनिष्ठ सभागृहाने मुंबई राज्याचा ठराव मंजूर केला व 1 मे 1960 रोजी मुंबई राजधानीसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.