Maharashtra Day 2023 Rangoli Designs: महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा होतो. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हे राज्य भारत देशाचे राज्य म्हणून ओळखले गेले होते. महाराष्ट्र राज्याचीनिर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जात होता. महाराष्ट्र निर्मितीसाठी अनेकांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. भारतात सण-उत्सवाच्या दिवशी रांगोळी काढण्याची प्रथा आहे. आज आपण पाहूयात महाराष्ट्र दिनानिमित्त काढता येतील अशा सोप्या रांगोळी डिझाईन्स व्हिडीओ पाहून तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता. महाराष्ट्र दिनानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. त्याठिकाणी तुम्ही आकर्षक रांगोळी काढू शकता, चला तर मग पाहूया
पाहा व्हिडीओ:
महाराष्ट्र दिन 2023 साठी हटके रांगोळी डिझाईन्स -
व्हिडीओ पाहून तुम्ही हटके रांगोळी झटपट काढू शकता, राज्यातील प्रत्येकासाठी 1 मे हा दिवस खूप खास आहे त्यामुळे रांगोळी काढून तुम्ही तुमचा आनंद द्विगुणीत करू शकता, सर्व बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!